बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संजय राठोड , बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष राहूल बोंद्रे यांच्या आदेशाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक सेलचे उपाध्यक्ष मोईन काझी यांनी इसोली तालुका चिखली येथील कडू लाला यांची बुलढाणा जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक सेल उपाध्यक्षपदी नियुक्ती पत्र देऊन नुकतीच केली.
सदर नियुक्ती ही बुलडाणा येथील एका कार्यक्रमात देण्यात आली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक सेलचे उपाध्यक्ष मोईन काझी यांनी सांगितले की, कडू लाला हे एकनिष्ठ कार्यकर्ता असून ही नियुक्ती त्यांच्याच कामाची पावती असल्याचे सांगितले.
कडू लाला यांनी ह्या नियुक्तीने काम करण्याची एक नवीन ऊर्जा मिळाली असल्याचे बोलून दाखवत अल्पसंख्याक सेल ला बळकटी देत, काँग्रेस पक्षाला मी अल्पसंख्याक समजाला एकजूट करून कामाच्या माध्यमातून मजबूत करण्यावर भर देऊ असे त्यांनी सांगितले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक सेल चे उपाध्यक्ष मोईन काझी, जिल्हा अध्यक्ष ॲड. जावेद शेख, सलीम भाई यांच्यासह आदी उपस्थित होते.