जंतर मंतर वरील युवकांचे आंदोलन पोलीसांनी चिरडले * राष्ट्रीय रोजगार नीती कायदा बनावा यासाठी लढा सुरूच राहणार - प्रशांत मोरे

 जंतर मंतर वरील युवकांचे आंदोलन पोलीसांनी चिरडले 
* राष्ट्रीय रोजगार नीती कायदा बनावा यासाठी लढा सुरूच राहणार -   प्रशांत मोरे 
दिल्ली : (एशिया मंच वृत्त)
       राष्ट्रीय रोजगार नीतीसाठी संपूर्ण भारतातून युवकांचे जंतर मंतरवर आंदोलन सुरु असतांना पोलिसांनी अडविले असतांना महाराष्ट्र कॉर्डिनेटर प्रशांत मोरे
दि. 19 डिसेंबर रोजी राष्ट्रीय रोजगार नीती हा कायदा बनावा व प्रत्येकाच्या हाताला काम मिळावे यासाठी देश की बात फाउंडेशन च्या माध्यमातून संपूर्ण भारतातून युवक दिल्ली येथे जंतर-मंतरवर 19 डिसेबर रोजी सकाळी 10 वाजेपासून आंदोलन सुरु करीत असताना त्यांना  थांबवून पोलीस प्रशासनाने युवकांना आंदोलनास मनाई केली. 
       मोठ्या संख्येने उपस्थित युवक आंदोलनाच्या तयारीत असल्याचे पाहून त्यांनी जबरदस्ती करून  युवकांना गाड्यामध्ये बसवून दिल्लीच्या बाहेर सोडून दिले. संविधानाने आपल्याला  स्वातंत्र्य दिलेले असताना आपल्यावर  होणाऱ्या अन्यायाला आपण गांधी मार्गाने व संविधानिक मार्गाने मागू शकत नाही, हे लोकशाही नसून हुकूमशाही आहे, असे महाराष्ट्र कॉर्डिनेटर प्रशांत मोरे यांनी यावेळी सांगितले.
        आज 20 डिसेंबर रोजी  येथील राजघाट येथे संपूर्ण भारतातून आलेले युवक एकत्र येऊन  उपोषणाची पुढील दिशा काय राहील हे असे प्रशांत मोरे यांनी सांगीतले. 
      महाराष्ट्रातील अनेक युवक या आंदोलनासाठी दिल्लीला उपस्थित आहेत. महाराष्ट्रातील अनेक युवकांना या आंदोलनात प्रेरणा मिळणार आहे. देशामध्ये कामाच्या अभावामुळे तसेच मिळालेले कामांमध्ये पुरेसे घर चालत नसल्यामुळे युवक हताश होत आहे व मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत आहेत. तसेच त्यांच्या कौटुंबिक समस्या, सामाजिक समस्या यांना बळी पडत आहे. त्यामुळे युवकांना काम मिळणे व त्या कामातून त्याला सामाजिक प्रतिष्ठा तसेच आर्थिक सुरक्षाही काळाची गरज आहे. जर त्याच्या हाताला योग्य काम मिळाले नाही तर हा युवक चुकीच्या मार्गाला लागून समाजासाठी धोकादायक बनू शकतो, त्यामुळे राष्ट्रीय रोजगार नीती ही संपूर्ण देशाची गरज आहे. त्यासाठी गेल्या दोन वर्षापासून देश की बात फाउंडेशन श्रीकृष्ण यादव यांच्या नेतृत्वात भारतभर लढत आहे. आंदोलन करत आहे. येत्या काळात सुद्धा फार मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याचा इशारा प्रशांत मोरे यांनी दिला. या आंदोलनासाठी महाराष्ट्रातील संदीप पाटील, बापू माळी व संतोष रंगे यांच्या नेतृत्वात अनेक महाराष्ट्रातले युवक या आंदोलनाला सहभागी झाले आहे.