पत्रकारा बद्दल आक्षेपार्ह मजकुर मोबाईल व्हॉटस ॲपवर टाकल्याने सबंधीतांवर गुन्हे दाखल करा : जिल्हाध्यक्ष रविंद्र वाघ* जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

पत्रकारा बद्दल  आक्षेपार्ह मजकुर मोबाईल व्हॉटस ॲपवर  टाकल्याने सबंधीतांवर गुन्हे दाखल करा : जिल्हाध्यक्ष रविंद्र वाघ
* जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी 
बुलढाणा : (एशिया मंच वृत्त)
     पत्रकार हा जनसामान्याचे प्रश्नाला वाचा फोडण्याचे  काम करीत असतो, दिवस रात्र तो  आपल्या परिवाराची तमा न बाळगता  काम करीत असतो, तरी देखील  पत्रकारा बद्दल  आक्षेपार्ह मजकुर टाकण्यात आल्याने पत्रकार बांधवांमध्ये नाराजीचा सुर उमटत आहे. तरी देखील  मोबाईल व्हॉटस अॅपवर बदनामी कारक  मजकुर टाकल्याने सबंधीतांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी असोसिएशन ऑफ  स्मॉल अँड मेडियम न्यूज पेपर ऑफ इंडियाचे जिल्हा अध्यक्ष रविंद्र वाघ यांनी 20 नोव्हेंबर 2023 रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदना द्वारे केली आहे.
     दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, माझ्या मोबाईल व्हॉटस अॅपवर एक मॅसेज आला. दिल्ली पासुन ग्रामपंचायत पर्यंत सर्व पत्रकारांना दिवाळी भेट आणी पाकिट मिळत असल्याने पत्रकार हे शेतक-यांच्या बाजुच्या बातम्या टाकत नाहीत. अशा प्रकारचा मॅसेज पेनटाकळी पाणी उपोषण ग्रुपवर 18 नोव्हेंबर 2023 रोजी ला आला आहे. तो मॅसेज रमेश निकस से.नि.शिक्षक रा.जानेफळ ता. मेहकर जि. बुलडाणा हा अॅडमिन म्हणुन ग्रुप चालवित आहे. पत्रकारीता हा देशाचा चौथा खांब आहे. जर पत्रकारावर असे मानहानीकारक मॅसेज पसरवीत असतील तर तो अवमानकारक आहे. तसेच पत्रकार बांधावांच्या भावना भडकाविण्याचा हेतु त्यांचा आहे असे जाणवत आहे. तरी तक्रार करण्यात येते की, सबंधीतांनी ज्या उद्देशाने  हा मॅसेज सोशल मिडीयावर प्रसारीत केला, त्याचेवर कायदेशिर कार्यवाही करुन गुन्हे दाखल करण्यात यावा व माफीनामा त्वरीत सबंधीतांकडुन प्रसारीत करण्यात यावा. अशी मागणी त्यांनी केली आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष रवींद्र वाघ, जिल्हा उपाध्यक्ष गजानन दुतोंडे, बुलढाणा तालुकाध्यक्ष शौकत शाह यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.