बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
समाजातील अनेक निराश्रित, निराधार व उपेक्षित लोक दिवाळी सणापासून वंचित राहतात. अशा वंचितांची दिवाळी गोड करण्यासाठी मुठे ले-आउटमधील भोसले परिवाराने सामाजिक उपक्रम राबविला.
गेल्या 11 वर्षांपासून मुठ्ठे ले आऊट येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश भोसले हे प्रत्येक दिवाळीला शहरातील निराधारांना फराळ व विविध साहित्य वाटप करून त्यांची दिवाळी गोड करतात. याच अनुषंगाने यंदाही त्यांनी पुढाकार घेत समाजातील वंचित घटकांसोबत दिवाळी साजरी करीत त्यांना फराळ व मिठाईचे वितरण केले. बुलडाणा शहरातील संगम चौक, जयस्तंभ चौक, इकबाल चौक, बसस्टैंड परिसर व मलकापूर रोड परिसरातील निराधार, बेसहारांना फराळ व मिठाईचे वाटप केले. यावेळी त्यांच्या सोबत अमृत पंडित, पंकज राजपुरोहित, संदिप तोंडे, अमोल देशपांडे, सोनु बाहेकर यांनी सुद्धा त्यांना या सामाजोपयोगी उपक्रमात सहकार्य केले.
