* महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन
बुलढाणा : (एशिया मंच वृत्त)
महात्मा फुले यांना अनेक भाषा अवगत होत्या. त्यांनी ग्रंथ वाचले त्यांनी चांगले शिक्षण घेतले व सावित्रीबाईंनाही शिकविले. पण याच काळात त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली की, समाज जर सुधारावयचा असेलतर आपल्याला पहिल्यांदा आपल्या समाजाशी, लोकांशी व संस्काराशी संस्काराशी संघर्ष करावा लागतो. त्याकाळी उच्चभ्रु वर्ग होता त्याचेशी संघर्ष करावा लागला, असे प्रतिपादन प्रा.डॉ. एस एम कानडजे यांनी केले.
बुलडाणा येथील महात्मा जोतिबा फुले मराठी उच्च प्राथमिक शाळेत मंगळवार २८ नोव्हेंबर २०२३ रोजी महात्मा जोतिबा फुले यांना व महात्मा जोतिबा फुले मंडळाचे माजी अध्यक्ष स्व.सुभाष मानकर यांना अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी महात्मा फुले समाजाचा सामाजिक वारसा या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होेते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणुन प्रा कानडजे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ विकास बाहेकर हे होते. विचारपिठावर महात्मा फुले मंडळाचे माजी अध्यक्ष पी सी चौधरी, श्रीकृष्ण अवचार, अध्यक्ष प्रकाश वानेरे आदिची उपस्थिती होती. यावेळी प्रा कानडजे म्हणाले की, महात्मा फुलेना वाटले की येथे तीन प्रकारे शोषण होत आहे. पहिल शोषण पौरोहित वर्ग निरक्षर व अज्ञानी लोकांची शोषण होते. दुसरे शोषण नोकरशाहीचे व तिसरे शिक्षण नसल्याने शोषण म्हणुन त्यांनी शिक्षणाला महत्व दिले. असे सांगत असतांनाचा महात्मा फुलेंचा वारसा सुभाष मानकर यांनी पुढे नेण्यासाठी शिक्षण संस्था सुरु केल्याचे कानडजे यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे संचालन गजेद्रसिंह राजपुत यांनी तर अाभार डॉ. देवयानी मानकर यांनी मानले. कार्यक्रमाला स्नेहलता मानकर, डॉ. हेमंत खेडकर, हरीभाऊ पल्हाडे आदिंची उपस्थिती होती.
* शिवाजी स्मारकाची प्रेरणा शक्ती मानकर सरांची
बुलडाणा शहर हे रिटायर लोकांची शहर आहे असे म्हणतात. बरेच रिटायर जण घरीच थांबतात पण मानकर सर हे नेहमी काहीतरी काम करत भटकत राहत होते. त्यांच्याच प्रेरणेतुन जगातील मोठा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शिवाजी स्मारक समिती ऊभी करत आहे.आज त्यांचे श्रेय कोणीही घेवो पण प्रेरणा मानकर सरांची आहे. मानकर सरांचे हे कर्तुत्व लक्षात घेण्यासारखे आहे. त्यांनी ऊभे केलेले कार्य कोणीतरी पुढे न्यावे, याकरता मानकर सरांना लवकर ईश्वर प्राप्ती झाल्याचे दु:ख डॉ. विकास बाहेकर यांनी व्यक्त केले.