* पळसखेड सपकाळ व उत्रादा येथे सव्वा सहा कोटी रुपयांच्या विकासकामांचे झाले भूमिपूजन व लोकार्पण
चिखली : (एशिया मंच वृत्त)
जनसेवेलाच ईश्वर सेवा समजून समर्पित भावनेने विकास कार्य करणाऱ्या आ. श्वेताताई महाले ह्या एक कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी आहेत. त्यांच्या या लोककल्याणकारी कार्यामुळे श्वेताताईंच्या पाठीशी जनआशीर्वादासोबतच संत महंतांचे आशीर्वाद देखील भक्कमपणे आहेत आणि भविष्यात देखील तेवढ्याच भक्कमपणे असतील असे आशीर्वाचन श्री हरीचैतन्य स्वामी महाराज, श्री गुरुदेव आश्रम, पळसखेड सपकाळ यांनी व्यक्त केले. आ. श्वेताताई महाले यांच्या प्रयत्नातून पळसखेड सपकाळ व उत्रादा येथे मंजूर झालेल्या सहा कोटी २५ लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाषण करताना १४ नोव्हेंबर रोजी ते बोलत होते. या प्रसंगी आ. श्वेताताई महाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सचिव विद्याधर महाले व आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
चिखली मतदारसंघातील पळसखेड सपकाळ व उत्रादा येथे ६ कोटी २५ लक्ष रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन केले. यामध्ये आमदार निधी २०-२१ अंतर्गत सिमेंट रस्त्याचे लोकार्पण, किंमत ५ लक्ष रुपये, आमदार निधी २२-२३ श्री संत सोनाजी महाराज संस्थान येथे सभामंडप बांधकाम करणे किंमत १० लक्ष रुपये, २५१५ योजना अंतर्गत रस्ता बांधकाम करणे किंमत ६ लक्ष रुपये, २५१५ योजना गोकुळ नगर ते किसन एकनाथ इंगळे यांच्या शेतापर्यंत शेत रस्ता किंमत ३ लक्ष रुपये, तांडा वस्ती सुधार योजना गोकुळ नगर येथे सिमेंट काँक्रीट रस्ता तयार करणे किंमत ५ लक्ष रुपये, तांडा वस्ती सुधार योजना अंतर्गत सिमेंट रस्ता किंमत ५ लक्ष रुपये, २५१५ योजना सिमेंट बेंच किंमत ७.८० लक्ष रुपये, जिल्हा वार्षिक योजना नवीन डीपी किंमत ६.२४ लक्ष रुपये, ९५:५ योजना गावअंतर्गत सिमेंट रस्ता करणे किंमत १० लक्ष रुपये, व्यायाम शाळा योजना व्यायामशाळा साहित्य किंमत ६ लक्ष रुपये, ९५:५ योजना श्री प्रकाश पवार यांच्या घरापासून ते आत्माराम कापूसिंग जाधव यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करणे किंमत १५ लक्ष रुपये, जलजीवन योजना गावांमध्ये पाणीपुरवठा योजना १६२ लक्ष रुपये, प्रादेशिक पर्यटन योजना श्री संत सोनाजी महाराज संस्थान येथे बहुउपयोगी सभामंडप बांधकाम करणे किंमत ३५ लक्ष रुपये (मंजुराधीन), २५१५ योजना अंतर्गत गोकुळ नगर ते किसन एकनाथ इंगळे यांच्या शेतापर्यंत शेत रस्ता किंमत ३ लक्ष रुपये, नाबार्ड योजना अंतर्गत बुलढाणा रोड ते गोकुळ नगर रोड बांधकाम करणे किंमत १२२ लक्ष रूपये, नाबार्ड योजना अंतर्गत गोकुळ नगर जाणाऱ्या रस्त्यावर पुलाचे बांधकाम करणे किंमत १३४ लक्ष रुपये या विकासकामांचा समावेश होता.
पळसखेड सपकाळ येथील सरपंच सिंधुताई रमेश इंगळे, ह. भ. प. प्रकाश महाराज जंवजाळ प्रदेश कार्यकारिणी सदस्य, डॉ प्रतापसिंग राजपूत प्रदेश कार्यकारिणी सदस्य, ह.भ.प. निवृत्तीनाथ येवले शास्त्री, माजी विद्यार्थी श्रीकृष्णदास वारकरी शिक्षण संस्था उत्रादा, साहेबराव पाटील सोळंके ज्येष्ठ भाजप नेते व अध्यक्ष- सिद्धेश्वर संस्थान, कोलारा, सिंधुताई अंकुश तायडे माजी सभापती पं.स. चिखली, प्रल्हाद पाटील इंगळे संचालक जिनिंग प्रेसिंग चिखली, सुनील वायाळ प्रदेश कार्यकारिणी सदस्य, शिवाजीराव देशमुख उपजिल्हाप्रमुख शिवसेना, डॉ. कृष्णकुमार सपकाळ जिल्हा सचिव भाजप, प्रा. वीरेंद्र वानखेडे जिल्हा कार्यकारिणी सदस्य, सुनिल पोफळे तालुका अध्यक्ष भाजप, दिगंबर जाधव भाजप नेते, गजानन मोरे तालुकाप्रमुख शिवसेना, पंजाबराव धनवे पाटील जिल्हा सरचिटणीस युवा मोर्चा, ॲड. संजय सदार तालुका अध्यक्ष लीगल सेल, संतोष काळे तालुका अध्यक्ष युवा मोर्चा, विकास जाधव तालुका अध्यक्ष शिक्षक आघाडी, गजानन परिहार, प्रल्हाद इंगळे, अनमोल ढोरे, सुनील जाधव, रामेश्वर सोळंकी सरपंच कोलारा, गीताताई सोळंके, भीमराव इंगळे, दुर्गादास इंगळे, श्रीमती आराधना इंगळे आदी मान्यवर या सोहळ्यास उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन सरपंच, उपसरपंच व सदस्य ग्रामपंचायत, श्री संत सोनाजी महाराज संस्थान, श्री विठ्ठल रुक्मिणी व उत्तरेश्वर महादेव मंदिर संस्थान, श्री जागृत हनुमान संस्थान गोकुळ नगर, तंटामुक्ती समिती, शाळा व्यवस्थापन समिती, तथा सर्व गावकरी मंडळी उत्रादा, ता. चिखली जि. बुलढाणा यांनी केले होते.
