* पारधी पाड्यावर श्वेताताईंनी साजरी केली दिवाळी
चिखली : (एशिया मंच वृत्त)
आनंद आणि स्नेहाची उजळण करणारा दिवाळीचा सण आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी चिखली शहरानजीक असलेल्या साकेगाव येथील भटक्या विमुक्त समाजाची वस्ती असलेल्या पारधी पाड्यावर जाऊन दिवाळी सण साजरा केला. यानिमित्त त्यांनी पारधी समाजातील बंधू भगिनी आणि बच्चे कंपनीला फराळाचे वाटप करून त्यांचा आनंद द्विगुणीत केला. आ. श्वेताताई महाले यांनी दिलेल्या या सुखद भेटीमुळे पारधी समाजातील बंधू-भगिनींना देखील अतिशय आनंद झाला व त्यांनी आ.श्वेताताई महाले यांच्या बद्दल आभार व्यक्त केले.
याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष पंडितराव देशमुख, माजी शहराध्यक्ष सुरेंद्र पांडे, चिखली मतदारसंघ निवडणूक प्रमुख सुनील वायाळ, अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शेख अनीस, साकेगाव येथील सरपंच उर्मिला पवार, जिल्हा सचिव कृष्णकुमार सपकाळ, माजी नगराध्यक्ष सुहास शेटे, सुभाषअप्पा झगडे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष सुदर्शन खरात, युवा मोर्चा शहराध्यक्ष सागर पुरोहित, शहर सरचिटणीस युवराज भुसारी, सचिन कोकाटे, राहुल निकाळजे यांच्यासह साकेगाव येथील भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बूथ प्रमुख, शक्ति केंद्रप्रमुख तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
* पारधी समाजाला प्रगतीच्या मार्गावर नेणार - आ. श्वेताताई महाले
साकेगाव येथील पारधी वस्तीला भेट दिल्यानंतर अंधार शेतातही महाले यांनी देखील रहिवासी असलेल्या पारधी समाजातील बंधू-भगिनींना फराळाचे वाटप केले आणि त्यांच्याशी संवाद साधला याप्रसंगी बोलताना आ. श्वेताताई महाले यांनी पारधी समाजाच्या सद्यस्थितीमध्ये सुधारणा करत त्यांना शिक्षण आरोग्य व कायमस्वरूपी घरकुलाची व्यवस्था करुन प्रगतीच्या पथावर नेण्याचा आपला मानस असल्याचे भावना व्यक्त केली. याशिवाय या समाजाचे दैवत असलेल्या जगदंबा मातेच्या मंदिराच्या बांधकामासाठी देखील 5 लक्ष रुपयांचा निधी आ. महाले यांनी यावेळी जाहीर केला.
