आग्यामोहळाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू * मोताळा तालुक्यातील घटना

आग्यामोहळाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू  
* मोताळा तालुक्यातील घटना

मोताळा : (एशिया मंच वृत्त)
       आग्यामोहळाच्या मधमाश्यांच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुरेश कळमकर असे शेतकऱ्याचे नाव आहे. मोताळा तालुक्यातील रिधोरा गावात  १७ नोव्हेंबरला ही घटना घडली.
        प्राप्त माहितीनुसार सुरेश कळमकर यांचा हेअर सलून चा व्यवसाय आहे, त्यांची रिधोरा येथे शेती आहे. आज १७ नोव्हेंबर २०२३ च्या सकाळी ते शेतात जात असताना आग्या मोहळाच्या मधमाश्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. हजारो मधमाशांनी डंख केल्याने सुरेश कळमकर यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.