राजे छत्रपती कला महाविद्यालय विभागाचा अभ्यास दौरा



राजे छत्रपती कला महाविद्यालय विभागाचा अभ्यास दौरा 
धामणगाव बढे : (एशिया मंच वृत्त)
        राजे छत्रपती महाविद्यालय धामणगाव बढे मराठी अभ्यास मंडळाच्या वतीने प्राध्यापक डॉ. गोविंद गायकी यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी विभागाचा अभ्यास दौरा करण्यात आला होता. याप्रसंगी महानुभाव संप्रदायातील चक्रधर स्वामीं च्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जाळी च्यादेवाला भेट दिली असून महानुभाव संप्रदायाच्या विविध ग्रंथाविषयी मानवा संप्रदायातील महंतच्या भेटी घेऊन मराठी वाङ्मयातील महानुभाव साहित्याच्या योगदानाबाबत व महानुभाव संप्रदायाच्या तत्त्वज्ञान संबंधित विद्यार्थ्यांनी चर्चा केली. त्याचप्रमाणे ना धो महानोर तुमच्या अजून त्या कविता संग्रह समजून घेताना प्रत्यक्ष अजिंठाना भेटी दिलेला आणि रॉबर्ट गिल व पारू यांच्या प्रेम कहानी विषयी गाईड करून माहिती मिळून घेतली. या अभ्यास दौऱ्यात एकूण 39 विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी प्राध्यापक डॉ. कामिनी मॅडम उपस्थित होत्या.