* जिल्हा पोलिस अधीक्षक यांचे नागरिकांना आवाहन
बुलढाणा : (एशिया मंच वृत्त)
कोणत्याही जाती-धर्मात तेढ निर्माण होईल असे फोटो मजकुर सोशल मिडीयावर (फेसबुक, व्हॉटसअॅप, इंस्टाग्राम व व्टिटरवर) पोस्ट करु नये, असे जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांनी जिल्हा वासियांना आवाहन केले आहे.
एखादी आक्षेपार्ह पोस्ट सोशल मिडीयावर प्रसारीत करणे हा गंभीर स्वरुपाचा दखलपात्र गुन्हा आहे व आपल्याविरुध्द दखलपात्र स्वरुपाचा गुन्हा दाखल झाल्यास आपण शासकिय नोकरी, पासपोर्ट व इतर शासकीय योजना इत्यादी लाभापासुन वंचित राहु शकता,
अशा प्रकारच्या कृत्यांवर पोलीसांची करडी नजर असून अशा व्यक्तींवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
कुठल्याही समाजविघातक कृत्यात सहभागी होउ नका अन्यथा कडक कायदेशीर कारवाई करण्यात यईल, असे बुलडाणा जिल्हा पोलीस दलातर्फे सर्व नागरीकांना कळविण्यात येते की कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवु नये तसेच सोशल मिडीयावर काही आक्षेपार्ह पोस्ट दिसुन आल्यास तात्काळ जवळचे पोलीस स्टेशन, नियंत्रण कक्ष बुलढाणा क्रमांक 07262-242400 किंवा 9422880113 वर संपर्क साधुन माहिती द्यावी. सामाजिक सलोखा राखण्यास पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असेही जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी आवाहन करून सतर्क रहावे, असे जिल्हा वासियांना सांगितले.
