भाजपा शिक्षक सेलच्या जिल्हाध्यक्षपदी डॉक्टर भगवान गरुडे यांची नियुक्ती
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
बुलढाणा जिल्हा भाजपा शिक्षक सेलच्या जिल्हाध्यक्षपदी डॉक्टर भगवान गरुडे यांची नियुक्ती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आली. प्राध्यापक डॉक्टर भगवान गरुडे रोहिणखेड ग्रामपंचायतचे बिनविरोध सदस्य असून राजकारणात आणि समाजकारणात सक्रिय आहेत तसेच विद्यापीठाच्या राजकारणात त्यांचा मानदंड आहे, बुलढाणा, विदर्भातील लोकसभेच्या निवडणुकीवर त्यांनी पीएचडी केली असून आज ते पि.एच.डि.चे सुपरवायझर आहेत. सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचे भरीव कार्य आहे. गोरगरीब जनतेच्या समस्यांना वाचा फोडण्याचे काम ते सतत करीत असतात, शिक्षकांच्या विविध मागण्यांना शासन दरबारी मांडून आपल्या विवेक बुध्दीच्या जोरावर सोडवतात. या सगळ्या बाबीचा विचार पक्ष श्रेष्ठींनी करून त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे, असे त्यांनी एशिया मंच न्युज शी बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केली. आपल्या निवडीचे श्रेय ते भाजपा जिल्हाध्यक्ष डॉक्टर गणेश मान्टे, भाजपा लोकनेते बुलढाणा जिल्हा लोकसभा संपर्क प्रमुख माजी आमदार विजयराज शिंदे यांना देतात.
