सिंदखेड राजा : (एशिया मंच वृत्त)
येथील मातृतिर्थ राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळी दिव्यांग कल्याण मंत्रालय दिव्यांगांच्या अभियानाचे अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ बच्चू कडु यांनी भेट दिली. बच्चू कडू यांनी राजमाता जिजाऊ यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी नगराध्यक्ष सतिश तायडे, तहसिलदार सचिन जयस्वाल, समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत आदी उपस्थित होते. संत क्षेत्र सावता भवन, सिंदखेड राजा येथे आयोजित रक्तदान शिबिरात भेट देऊन स्वतः रक्तदान केले. त्यानंतर जिल्हा दौऱ्या दरम्यान खामगाव येथील मोठी देवी उत्सवास भेट देऊन दर्शन घेतले.
