* मध्यप्रदेश, यूपीतूनही संघ होणार सहभागी
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
जयमातृभूमी क्रीडा मंडळाची राष्ट्रीय खेळाडू कै. प्राजक्त देशमुख यांच्या स्मृती प्रित्यर्थ एक दिवशीय कबड्डीचे खुले सामने 28 ऑक्टोबर 2023 रोजी आयोजित करण्यात आले आहे. या स्पर्धेत निमंत्रीत संघ सहभागी होणार आहेत.
बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचे सहकार्य व मार्गदर्शनामध्ये पालिका उपाध्यक्ष विजय जायभाये यांच्या पुढाकारातून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे प्रथम बक्षीस हे ५१ हजार रुपये असून द्वितीय बक्षीस ३१ हजार रुपये तृतीय आणि चतुर्थ बक्षीस हे प्रत्येकी ११ हजार रुपये आहे. या स्पर्धेचे उद्घाटन 28 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता धर्मवीर आखाड्याचे अध्यक्ष मृत्यूंजय संजय गायकवाड यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहूणे म्हणून बुलढाणा अर्बनचे एमडी सुकेश झंवर, शिवसेना जिल्हा प्रमुख अेामसिंग राजपूत, शिवसेना नेते बाळू धुड, नगरसेवक दीपक सोनुने, सुंदरखेडचे उपसरपंच नीलेश राठोड, रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष तुषार काचकुरे तसेच सुषार सावजी हे रहातील. या स्पर्धेत नामवंत संघ सहभागी होणार असल्याने प्रदीर्घ कालावधीनंतर बुलडाण्यात रंगदार सामन्यांची मेजवाणी बुलढाणेकराना बघावयास मिळणार आहे.
