वीर जवान अक्षयचे नाव सुवर्ण अक्षरात नोंदविले जाणार - कर्नल चौधरी

वीर जवान अक्षयचे नाव सुवर्ण अक्षरात नोंदविले जाणार - कर्नल चौधरी 
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
        सियाचीन ग्लेशीअर येथील सर्वात  उंच बर्फाळ सिमा भागात कर्तव्यावर असतांना चिखली तालुक्यातील पिंपळगांव सराई येथील अग्निवीर जवान अक्षय लक्ष्मण गवते यांचा अकाली मृत्यू झाल्याने पंचक्रोशीत शोककळा पसरली होती. दरम्यान २६ ऑक्टोबर 2023 च्या सकाळी पिंपळगांव सराई येथे रक्षाविसर्जन  प्रसंगी वीर जवान अक्षयच्या कुटूंबियांची अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस माजी सैनिक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष कर्नल रोहीत चौधरी यांनी भेट घेवून काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांच्या शोक संवेदना वीरपिता लक्ष्मण गवते य वीरमाता अलका गवते यांना देत कुटुंबियांचे सात्वन केले. 

     यावेळी बुलडाणा जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे, राष्ट्रीय समन्वयक संदेश सिंघलकर, आमदार धिरज लिंगाडे, माजी सैनिक कल्याण विभागाचे पदाधिकारी गावकरी तथा कॉंग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिका-यांची मोठया संख्येने उपस्थिती होती. यावेळी कर्नल रोहित चौधरी यांनी अग्नीविरांच्या हक्काच्या लढाईत अक्षयचे नाव सुवर्ण अक्षरात नोंदविले जाणार असल्याचे  त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी स्व. अक्षय गवते यांच्या स्मृतीत आम्र वृक्षांची लागवड करण्यात आली.           कर्नल चौधरी पुढे म्हणाले की, मी दिल्ली
येथुन कॉंग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुलजी गांधी यांनी दिलेला शोक संदेश घेवून आपल्या पर्यंत आलो. देशाच्या व मातृभुमीच्या संरक्षणासाठी प्राण देणे ही अभिमानास्पद बाब असून अक्षयच्या अकाली जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीच भरून न निघणारी आहे. त्याच्या जाण्यामुळे गवते कुटूंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून या दुःखद समयी आम्ही सारे आपल्या सोबत आहोत. सैनिक आणि अग्नीवीर यांना समान सुविधा प्राप्त व्हाव्या या मागणीसाठी खा. राहुल गांधी यांनी सरकार विरोधात सर्वप्रथम आवाज उठविल्याचे सांगून वीरजवान अक्षयच्या विर मरणाने अग्नीवीराच्या हक्काच्या लढाईला दिशा मिळाली असून त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. यावेळी वीरजवान
अक्षय गवते यांच्या स्मृती अनेक तरूणांना देश सेवेसाठी प्रेरीत करत राहाव्या यासाठी रक्षा विजर्सनप्रसंगी त्यांच्या पवित्र रक्षेचा अंश झाडाच्या तळाशी टाकून वृक्षांचे रोपण करण्यात आले. 
       यावेळी बुलढाणा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे, राष्ट्रीय समन्वयक संदेश सिंघलकर, प्रदेश सचिव हाजी दादुसेठ, आमदार धिरज लिंगाडे, रिजवान सौदागर, सतिष मेहेंद्रे, चॉद मुजावर, माजी सैनिक कल्याण विभागाचे पदाधिकारी, गावकरी तथा कॉंग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिका-यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.