नादुरूस्त एसटी बसवर मिनीट्रक धडकला ; चालक जागीच ठार * पिंपळगाव राजा परिसरातील राहूड फाट्यावरील घटना

नादुरूस्त एसटी बसवर मिनीट्रक धडकला ; चालक जागीच ठार
 * पिंपळगाव राजा परिसरातील राहूड फाट्यावरील घटना 
खामगाव : (एशिया मंच वृत्त)
        भरधाव मालवाहू मिनीट्रकची नादुरूस्त बस दुसऱ्या बसच्या साहाय्याने टोचन बांधून आणत असताना यावर धडक. या भीषण अपघातात मिनी ट्रकचा चालक ठार झाला. तर एसटीचा चालक गंभीर जखमी झाला. ही घटना खामगाव पिंपळगाव राजा रस्त्यावरील राहूड फाट्यावर शुक्रवारी पहाटे घडली.
          याबाबत मिळालेली माहिती अशी की, एसटी चालक अरविंद पंडित दामोदर ३४ रा. जळका भडंग यांनी दिलेल्या तक्रारीनुसार खामगाव आगाराची एमएच ०६ एस ८२५६ क्रमांकाची बस नादुरूस्त झाली होती. ही नादुरूस्त बस दुरूस्तीसाठी खामगाव आगारात एमएच ४० एक्यू ६१३० या एसटीच्या बसच्या साहाय्याने टोचन बांधून खामगावकडे आणत होते.
      दरम्यान एमएच ०४ डीएस ८८५५ चा चालक नईम शहा कयुम शहा रा. राजूर ता. मोताळा याने त्याच्या ताब्यातील मिनीट्रक भरधाव व निष्काळजी पणे चालवून नादुरूस्त एसटी बसला धडक दिली. यात गंभीर जखमी होऊन स्वत:च्या मृत्यूस कारणीभूत ठरला. तसेच बसचे ४५ हजार रूपयांचे नुकसान केल्याचा आराेप केला. या तक्रारीवरून पिंपळगाव राजा पोलीसांनी मृतक ट्रक चालका विरोधात भादंवि कलम ३०४ अ, २७९, ३३७, ४२७ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.