शिवसाईच्या खेळाडूंची धनुर्विद्या स्पर्धेत राज्यस्तरावर झेप

शिवसाईच्या खेळाडूंची धनुर्विद्या स्पर्धेत राज्यस्तरावर झेप
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
       नुकत्याच संपन्न झालेल्या विभागीय स्तर शालेय धनुर्विद्या स्पर्धेचे आयोजन क्रीडा व सेवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व अमरावती विभागीय शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन नुकतेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वाशिम यांच्यातर्फे वाशिम नगरीत करण्यात आले होते. या स्पर्धेत बुलडाणा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व  महाविद्यालयातील चार खेळाडू करीत होते. ही स्पर्धा दिनांक 7 व 8 ऑक्टोंबर 2023 रोजी वाशीम या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. 
       या स्पर्धेत वेगवेगळ्या गटात महाविद्यालयातील विद्यार्थी यांनी विजय संपादन केला. वयोगट अंडर 17 मध्ये मानव जाधव  (कंपाउंड राउंड मध्ये )याने सुवर्णपदक प्राप्त केले. तर साईश अंभोरे याने सिल्वर मेडल प्राप्त केले. अंडर 19 मध्ये मिहीर अपार ( कंपाउंड राउंड ) सुवर्ण पदक प्राप्त केले. तर अद्वैत घुगे याने देखील सिल्वर मेडल प्राप्त केले. या सर्व खेळाडूंनी शालेय राज्यस्तरीय स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले.
       सर्व खेळाच्या यशामध्ये खेळाडू यशाचे श्रेय आपले आई-वडील,  प्रशिक्षक चंद्रकांत इलग सर व क्रीडा शिक्षक सागर उबाळे सर यांना देतात . या खेळाडूंनी आतापर्यंत अनेक स्पर्धेत आपल्या राज्याला व देशाला पदके प्राप्त करून दिली आहे. त्यांच्या यशाबद्दल शिवसाई युनिव्हर्सल स्कूलचे प्राचार्य प्रमोद मोहरकर  व शिवसाई पतसंस्थेचे संचालक डी. एस. लहाने  यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. सोबतच दोघांनीही खेळाडूंशी बोलताना अशी आशा अपेक्षा व्यक्त केली की, येत्या 2028 मध्ये होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत आपल्या देशाचे प्रतिनिधित्व आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थी खेळाडूंनी  करावे. व देशाला ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त करून द्यावे, अशी अपेक्षा खेळाडूंकडून व्यक्त केली.