* युवा सेनेची मुख्यधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
चिखली : (एशिया मंच वृत्त)
चिखलीकरांना नियमित ५ व्या दिवशी पाणी पुरवठा करण्यात यावा यासाठी चिखली शिवसेना युवासेना (उ.बा.ठा.) यांच्यावतीने चिखली न. प. मुख्यधिकारी यांच्याकडे १० ऑक्टोबर २०२३ रोजी एका निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चिखली शहरात तब्बल १५ दिवसानंतर पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना तिव्र पाणी टंचाई जाणवू लागली आहे. महिन्यातून दोनवेळ नळाला पाणी येत असुन कमी साठवणूक असलेल्या सामान्य जनतेला पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शहराला पाणी पुरवठा करणारी पेनटाकळी प्रकल्पामध्ये पुरेसा पाणी साठा उपलब्ध असतांना सुध्दा १५ दिसाआड पाणी पुरवठा होत आहे. त्यातही पिवळे व दुषीत पाणी नळाला येत आहे.
या दुषीत पाण्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही, तरी याचा गांभीर्याने विचार करून नळाला किमान ५ दिवसाच्या आड पाणी पुरवठा करावा. अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करू असा इशारा शिवसैनिकांनी यावेळी दिला. या निवेदनावर युवासेना चिखली शहर प्रमुख आनंद गैची , उपशहर गणेश कुडके , शंभु गाडेकर, बंडु नेमाने , अनिल जावरे, सचिन चोरघडे, राहुल वरवडे, रवी पेटकर, अक्षय कानाडे, दीपक सोलाट, अतुल मगर , किशोर महाले, यश लाटे, अभिषेक चेडे, तुषार चवरे, योगेश पगारे, विकी गायकवाड, शैलेंद्र डोनगावकर, बंडू गारडे, सचीन जोशी, महेश चौधरी, राम सोलाट ,लखन गैची यासह आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.
