आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा : पुरुषोत्तम बोर्डे* शिरपूर येथे शेकडो रुग्णांनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ

आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा : पुरुषोत्तम बोर्डे
* शिरपूर येथे शेकडो रुग्णांनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ 
बुलढाणा : (एशिया मंच वृत्त)
        आरोग्य सेवा हिच रुग्ण सेवा हे ब्रीदवाक्य जपत राजे छत्रपती विचार मंच यांच्या वतीने मौजे शिरपूर तालुका जिल्हा बुलढाणा येथे नागरिकांच्या आरोग्य समस्यांचा विचार करून भव्य आरोग्य शिबिराचे तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन केले होते. या शिबिरात शेकडो रुग्णांनी लाभ घेतला. तसेच असंख्य ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग उपस्थित होते. 
       यावेळी पुढे बोलतांना पुरुषोत्तम बोर्डे म्हणाले की, रोजच्या कुटुंबाच्या धावपळीत अनेक महिला तसेच ज्येष्ठ नागरिक स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे महिलांचे आरोग्य अधिक बिघडत चालले आहे. त्यात गावापासून सुविधा लांब असल्याने महिलांचे व ज्येष्ठ नागरिकांचे जाणे होत नाही. त्यामुळे घराच्या परिसरातच ही सुविधा राजे छत्रपती शिवाजी महाराज विचार मंचने उपलब्ध करून दिली, ही कौतुकास्पद बाब असल्याचे सांगितले, तर या आरोग्य शिबीरामध्ये विविध आजाराची तपासणी व औषधोपचार शेकडो रुग्णांनी घेतला. उपस्थित सर्व डॉक्टरांच्या हस्ते छञपती शिवाजी महाराज डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
     या आरोग्य शिबिरासाठी बुलढाणा शहरातील प्रसिध्द व नामांकीत बालरोग तज्ञ अक्षय हिरे ,जनरल सर्जन अनंता मगर , नेत्ररोग तज्ञ दिपाली पाटील ,अस्थिरोग तज्ञ निखील बोथरा ,जनरल फीजिशियन सुनील राजपुत स्रिरोग तज्ञ प्रमिला सोळंकी यांनी आपला अमुल्य वेळ देवुन रुग्ण तपासणी केली. तसेच शिवसाई पॅथॉलॉजी लॅब कडुन रक्तगट तपासणी करण्यात आली. यावेळी दैनिक लोकमंथनचे निवासी संपादक पुरुषोत्तम बोर्डे यांची यावेळी विषेश उपस्थिती होती.तर गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती नारायणराव पाटील , दिनकरराव पाटील जनार्धन सुसर, मधुकर पवार, संतोष शेळके , बाळासाहेब शेळके, अंकुश सुसर, राजेश शेळके , दिनकर वाघमारे, कैलास शेळके, समाधान वाघमारे, विजय पडोळ, अंकुश वैद्य, दिपक वाघमारे यांची उपस्थिती होती.
      बुलढाणा जिल्हाअध्यक्ष अनिल वाघमारे यांच्या सहकार्याने आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले. यावेळी राजे छञपती शिवाजी महाराज स्वराज्य विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष अंबादास घेवंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाला उमेश पाटील ,अविनाश पाटील, शेख शगीर , प्रल्हाद वानेरे, विजय पडोळ, देवीदास बावीस्कर, गजानन नेमाने यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते.