* आमदार संजय गायकवाड यांनी केला पाठपुरावा
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
बुलडाणा विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांना तत्काळ गती देण्यात यावी असे आदेश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 12 ऑक्टोबर 2023 रोजी घेण्यात आलेल्या बैठकीत दिले. सदर बैठक मुंबई येथील सह्याद्री आदितीगृह येथे पार पडली. यावेळी विविध विभागाचे सचिव अधिकारी आदी उपस्थित होते.
बुलडाणा विधानसभा मतदारसंघात आमदार संजय गायकवाड यांच्या विकासाचा झंजावात सातत्याने पहावयास मिळत आहे. विधानसभा मतदारसंघात अनेक कामे सध्या मंजूर झालेली आहेत या कामांचा पाठपुरावा करीत असताना आमदार संजय गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंजूर कामांना तत्काळ गती देण्यात यावी यासाठी आग्रह धरला होता, त्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी विविध विषयाच्या सचिवांची बैठक घेऊन सदर कामांना तत्काळ गती देण्याचे विशेष आदेश दिले आहेत. यामध्ये बोदवड परिसर उपसा सिंचन योजना मध्ये मोताळा तालुक्यातील गावे वाढवणे व योजना तत्काळ सुरू करण्यासंदर्भात आमदार संजय गायकवाड यांनी मागणी केली होती. या योजनेत जिल्ह्यातील एकूण 101 गावांचा समावेश असून बेचाळीस हजार चारशे वीस हेक्टर सिंचन क्षेत्र प्रस्तावित आहेत. सदर योजनेमध्ये मोताळा तालुक्यातील 15 गावात समावेश आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात नियोजित जुना धरणाच्या कामास वर्ष 2017 मध्ये सुरुवात झाली. या धरणाचे काम जवळपास 80% पूर्ण झाले आहे. टप्पा एक अंतर्गत 32 हजार 540 हेक्टर क्षेत्राचे दाबयुक्त बंदिस्त नलिका वितरण प्रणाली पद्धतीने संकल्पनाची कार्यवाही प्रगतीपथावर आहे. सदर योजनेची व्याप्ती पाहता क्षेत्रीय कामे पूर्ण करण्यास तीन वर्षे चा कालावधी लागू शकतो, त्या अनुषंगाने डिसेंबर 2026 पर्यंत कामे पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहेत. या योजनेत मोताळा तालुक्यातील 17 गावांचा समावेश करण्याचे नियोजन आहे. सदर गावांच्या पाणी प्रश्न कायम स्वरूपात निघाली काढण्यासाठी सर्वेक्षण करून उचित कार्यवाही करण्याचे आदेश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.
विधानसभा निर्वाचन क्षेत्रांतर्गतील गिरडा येथील स्टोरेज डॅम उभारणे व मूर्ती येथील सिंचन क्षमता वाढवण्यासाठी तसेच हारमोड धरण ची उंची वाढविणे व मोहेगाव नदीचे पावसाचे पाणी या धरणात लिफ्ट करण्यासंदर्भात जलसंधारण विभाग विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर तसेच जिल्हा परिषद बुलडाणा यांना दोन महिन्याचा कालावधी देण्यात आलेला आहे. मोताळा तालुक्यातील नवीन एमआयडीसीची स्थापना करण्यासंदर्भात व बुलडाणा येथील एमआयडीसी शेत्र वाढविण्यासाठी उद्योग ऊर्जा व कामगार विभाग यांना आदेश देण्यात आलेले आहेत. बुलडाणा राजुर घाटातील एकेरी वाहतूक संदर्भात बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर, बुलडाणा, चिखली हा राज्यमार्ग क्रमांक 167 राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 असून खाजगीकरण अंतर्गत दुपदरी रस्ता करण्यात आलेला आहे, परंतु सदर रस्ता हा अरुंद असल्यामुळे सदर रस्त्यामध्ये असणाऱ्या राजुर घाटात सतत वाहतूक कोंडी होते अस्तित्वातील रस्ता हा एकेरी वाहतुकी करता उपयोगात आणून नवीन दुसरा पर्याय रस्ता करण्याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. या संदर्भात दोन महिन्याच्या कालावधीत सदर अहवाल पाठविण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. बुलडाणा शहराला रिंग रोड मंजूर करणे व बुलडाणा - खामगाव रस्त्यावरील बोथा अभयारण्यातील उडान पूल बांधण्याबाबत देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत. पल्लवी धरणाचे ओव्हर फ्लो चे पाणी नळगंगा धरण व धामणगाव देशमुख च्या धरणात नेण्यासंदर्भात निर्देशक देण्यात आलेले होते, सदर काम गतीने करण्यात यावे असे आदेश देखील मुख्यमंत्र्यांनी दिले आहे . बुलडाणा नगरपालिका अंतर्गत येणाऱ्या येळगाव परिसरातील पडीक जागेत वीस कोटी रुपये पर्यंतचे पर्यटन केंद्रसाठी उपलब्ध करून देणे व नळगंगा धरणा खाली निसर्ग पर्यटन उभारणे संदर्भात उर्वरित निधी देण्याची मागणी आमदार संजय गायकवाड यांनी केली होती. सदर मागणीनुसार पाच कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली व एक कोटी वितरित करण्याचे आदेश देण्यात आले.
सदर कामे व सर्वेक्षण तत्काळ करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर बुलडाणा विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासाची गंगा वाहणार असल्याचे चर्चा नागरिकात होत आहे.
