सामान्यांची सेवा हेच 'प्रहार'चे लक्ष्य:सागर पाटील गुजर * सामाजिक कार्यकर्ते अरविंद गुजर यांचा प्रहारमध्ये प्रवेश

सामान्यांची सेवा हेच 'प्रहार'चे लक्ष्य : सागर पाटील गुजर 
* सामाजिक कार्यकर्ते अरविंद गुजर यांचा प्रहारमध्ये प्रवेश
धाड : (एशिया मंच वृत्त)
     गोरगरीग, दिव्यांग व रुग्णांच्या सेवेतून आ. बच्चू कडू यांनी 'प्रहार'जन्मास घातली. त्यांच्या पाऊलावर पाऊल टाकुनच आमचं कार्य सुरु आहे. सामन्यांची सेवा हेच 'प्रहार'चे मुख्य लक्ष्य आहे, असे प्रतिपादन प्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हाप्रमुख सागर पाटील गुजर यांनी केले.

      प्रहार जनशक्ती पक्षाच्या 'शिवदरबार'या जनसंपर्क कार्यालयात नुकताच सामाजिक कार्यकर्ते तथा उत्कृष्ट सुत्रसंचालक अरविंद पाटील गुजर, अनिल दांडगे यांनी सागर गुजर यांच्या हस्ते आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह प्रहारमध्ये प्रेवश घेतला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाप्रमुख वैभवराजे मोहिते, तर प्रमुख उपस्थितीत विभागप्रमुख संतोष उबाळे, सोणू वाघ, गणेश जाधव, आकाश सिरसाठ, सोणू सिरसाट, वैभव वाघुर्डे, सय्यद मोहंमद, हकीम कुरेशी, उमेश घाडगे, अमोल मोहिते, सचिन गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सागर गुजर, वैभवराजे मोहिते, संतोष उबाळे यांनी अरविंद पाटील गुजर, अनिल दांडगे व त्यांच्या सोबत प्रवेश घेणाऱ्या कार्यकर्त्यांचा प्रहारचा रुमाल, श्रीफळ व पुष्पहार घालुन स्वागत केले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. 
       यावेळी बोलतांना अरविंद गुजर यांनी स्व.बापुराव पाटलांनी आयुष्यभर समाजाची सेवा केली. त्यांचाच वारसा आपल्याला लाभला आहे. स्व.बापुराप पाटलांना अभिप्रेत असलेले समाजकार्यच प्रहारच्या माध्यमातून सुरु आहे. या कार्याला हातभार लावण्यासाठीच प्रहारमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले. अध्यक्षीय भाषणात वैभवराजे मोहिते यांनी जात, पात, धर्म, पंथ आमच्यासाठी दुय्यम आहे. सेवा हाच आमचा धर्म असुन समाजातील दुर्बल घटकांच्या न्यायहक्कासाठी प्रहारचा लढा सुरु असल्याचे सांगितले.

      कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुनिल वाघ यांनी केले. यावेळी अनंत उबाळे, सुभाष मोहिते, सचिन नेमाने, नाना गुजर, वैभव माळोदे, शुभम मोहिते, धीरज सरोदे, शुभम कुटे, विष्णू घाडगे, अरविंद गुजर, गोपाल गुजर, सागर गायकवाड, निलेश चिंचोले, शेषराव ठाकरे, अनिल वाघ, विलास ठाकरे, गोटू पवार, अजय शिंदे, अमोल माळोदे, हेमंत उबाळे, बाळू आरेकास, नितीन परमेश्वर, प्रवीण गुजर, श्रीकांत गुजर, आकाश गुजर, राहुल येंडोले, प्रताप डुकरे, सुरेश साळवे, गजानन साळवे, आशिष उबाळे यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.