शुरविर जिवाजींच्या चरित्रातून प्रखर देशप्रेमाचे धडे - सुनिल सपकाळ

शुरविर जिवाजींच्या चरित्रातून प्रखर देशप्रेमाचे धडे - सुनिल सपकाळ
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
      होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी अशी म्हण शिवकालीन रुढ झाली. स्वत:च्या जिवाची पर्वा न करता स्वराज्याचा क्रांतिकारी विचार देणारे शिवराय हेच सर्वस्व मानून जिवाजीचा पराक्रम घडला. त्यांच्या चरित्रावरुन प्रखर देशकार्याची प्रेरणा सदोहीत मिळत राहील. असे प्रतिपादन शिवजयंती उत्सव समितीचे सचिव सुनिल सपकाळ यांनी केले.

      शिवजयंती उत्सव समितीच्या चिंचोले चौक येथिल शिवाज्ञा कार्यालयात नरविर जिवाजी महाले जयंती कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.शोन चिंचोले होते तर प्रमुख अतिथी म्हणून सचिव सुनिल सपकाळ, ॲड.नंदकिशोर साखरे, प्रा.जगदिशराव बाहेकर, डॉ.मनोहर तुपकर, पत्रकार गणेश निकम, प्रा.अमोल वानखेडे, गजानन नाईकवाडे, सचिन सुस्ते, बिडवे काका आदींची उपस्थिती लाभली. 
यावेळी सुनिल सपकाळ यांनी जिवाजी महालेंच्या कार्यकर्तुत्वाचा आलेख मांडला. शिवाजी महाराजांचे स्वराज्य उभे राहिले ते प्रामाणिक सवंगड्यांच्या जोरावर. देशप्रेमाची प्रखर भावना असणारे नरविर जिवाजी महाले प्रखर राष्ट्रभक्तीचे प्रतिक असल्याचे त्यांनी सांगितले.

* मान्यवरांचे सन्मान  : 
       विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्तिंचा सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने सन्मान केला जातो. या कार्यक्रमात ॲड.नंदूभाऊ साखरे, रवि पाटील, सचिन सुस्ते, राजेंद्र काळे, आदींना शाल श्रीफळ स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. संचलन प्रा.गोपालसिंग राजपूत यांनी तर आभार प्रदर्शन राजेंद्र काळे यांनी मांडले. शिवजयंती समितीचे कार्य केवळ शिवजयंती या एकादिवसा पूरते मर्यादीत न ठेवता वर्षभर अठरापगड जाती धर्माच्या महापुरुषांच्या जयंतीचे आयोजन केल्याबद्दल डॉ.शोन चिंचोले यांचाही सत्कार मान्यवरांनी केला.

* जिवाजींचे ऋण फेडता येणार नाही - डॉ.शोण चिंचोले

       शिवाजी महाराजांचा रोमांचकारी इतिहास वाचतांना सर्वात रोमहर्षक प्रसंगी जिवाजी महाराज धावून आल्याचे दिसते. काही क्षण जरी दिरंगाई झाली असती तर शिवरायांच्या जिवावर बेतले असते. म्हणूनच होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी असे म्हटले जाते. जिवाजी यांच्या सारख्या प्रामाणिक व्यक्तीमुळेच स्वराज्य उभे राहिले असे सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष डॉ.शोन चिंचोले यांनी सांगून जिवाजींच्या पराक्रमावर प्रभावी भाष्य केले. यावेळी प्रा.अमोल वानखेडे, राजेंद्र काळे, गणेश निकम यांनी विचार मांडले.