बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. 12 ते 14 ऑक्टोबर दरम्यान त्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतील. शुक्रवार 13 ऑक्टोबर 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात महिलांच्या जनसुनावणीस उपस्थित राहतील.
दौऱ्यानुसार श्रीमती चाकणकर यांचे गुरूवार 12 ऑक्टोबर 2023 रोजी सायंकाळी 6 वाजता बुलडाणा येथील शासकीय विश्रामगृह येथे आगमन होऊन मुक्काम करतील. शुक्रवार 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जनसुनावणी होईल. त्यानंतर दुपारी 3 वाजता महिला व बालकांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय आढावा बैठक घेईल. तसेच सायंकाळी 5 वाजता पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. सायंकाळी 6 वाजता बुलडाणा येथील शासकीय विश्रामगृहात मुक्काम करतील. शनिवार 14 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता सिंदखेड राजा येथील राजमाता जिजाऊ जन्मस्थळाला भेट देतील.
