लोणार : (एशिया मंच वृत्त)
लोणार ग्रामीण रुग्णालयास नुकतीच बुलडाणा जिल्हा चिकीत्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी पाहणी करून ग्रामीण रुग्णालयामध्ये असलेल्या समस्या त्वरीत दुर करून सर्वसामान्य जनतेला चांगल्या प्रकारची सेवा देण्याच्या सुचना यावेळी दिल्या.
बुलडाणा जिल्हा शल्य चिकीत्संक डॉ. सुभाष चव्हाण यांनी 14 ऑक्टोबर 2023 रोजी अचानक ग्रामीण रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी आले. यावेळी ग्रामीण रुग्णालयातील सर्व कर्मचारी उपस्थीत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकीत्संक यांनी ग्रामीण रुग्णालयाची संपुर्ण भागाची पाहणी केली. यावेळी त्याना आढळुन आलेल्या समस्या त्वरीत दुर करून सर्वसमान्य नागरिकाना चांगल्या प्रकारच्या सुविधा देण्यात यावे, असे आदेश दिले. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. शहा , डॉ. शेख, डॉ. अग्रवाल, डॉ. मापारी, उगले , नरवाडे, , वायाळ,कमर्चारी खरात , अंभोरे, पाडळे, घुगे, विर , गवई आदी कर्मचारी उपस्थीत होते. यावेळी ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुभाष चव्हाण यांचे शाल पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.
