बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
डोंगरखंडाळा गावातील बालरोग तज्ज्ञ डॉ.प्रमोद देशपांडे यांच्या देशपांडे परिवारातील प्रभावी परोपकारी व्यक्तिमत्त्व असलेले त्यांचे वडील कै.भाऊसाहेब देशपांडे यांनी डोंगरखंडाळा गावातील सर्व समाजातील लोकांसाठी केलेल्या कार्यासह इ.स.1600 ते 2013 या काळातील 400 वर्षाचे वंशावळीचे "कुलवृत्तान्त" पुस्तकाचे अक्षरबध्द करुन स्थानिक एडेड हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय बुलडाणा येथे बुलडाणा अर्बन संस्थापक अध्यक्ष आदरणीय राधेश्याम चांडक यांच्या हस्ते, देशपांडे परिवार तसेच बुलडाणा एज्युकेशन सोसायटी व्यवस्थापक मंडळ, नातेवाईक तसेच एडेड हायस्कूल व शारदा ज्ञानपीठ बुलडाणा सर्व कर्मचारी वृंद, डोंगरखंडाळा गावातील रहिवासी तसेच या पुस्तकाचे लेखक रघुनंदन देशपांडे यांच्या उपस्थितीत प्रकाशित करण्यात आले.
प्रमुख पाहुणे आदरणीय राधेश्यामजी चांडक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना डॉ.देशपांडे सोबत बालपण आपल्या जुन्या मैत्रीच्या आठवणीला उजाळा दिला.
डॉ.प्रमोद देशपांडे यांनी आपल्या 76 वर्षाच्या जिवनातील मदत करणाऱ्यांना प्रति ॠणनिर्दश व्यक्त करताना जेव्हा 1992 मध्ये त्यांना हृदयविकाराचे बायपास शस्त्रक्रिया करण्यात आले, त्यावेळी आदरणीय राधेश्याम चांडक यांनी पैसा व रक्तदान करणारे मंडळी घेऊन मुंबईला आले तसेच कै.भास्कराव शिंगणे , आमदार राजेन्द्र शिंगणे यांनी केलेल्या मदतीबद्दल ॠण व्यक्त केले.
आभार प्रदर्शन सौ.रंजना रमेश देशपांडे यांनी व्यक्त केले तर या कार्यक्रमाला बुलडाणा शहरातील अनेक नागरिक उपस्थित होते.
