शेख करीम यांच्या उपोषणाला उजाडला ३ रा दिवस
* अद्यापही मंडळ अधिकारी,तलाठ्यासह तहसीलदारहि फिरकले नाही.
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
मौजे साखरखेर्डा येथील शेतकरी शेख करिम शेख रशिद यांच्या उपोषणाकडे अद्यापही निगरगठ्ठ मंडळ अधिकारी, तलाठ्यासह तहसीलदारही फिरकले नाही, मात्र जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाकडून गृह विभाग शाखा प्रमुख यांनी दुसऱ्या दिवशी दखल घेऊन गृहविभाग कक्ष ४(४) कावी ७५१/२०२३ दिनांक २१ ऑगस्ट २०२३ नुसार प्रभारी महसूल अधिकारी बुलडाणा व सिंदखेड राजा तहसीलदार यांना लेखी पत्र देऊन अर्जदाराने अर्जात नमूद केलेल्या मुद्यांच्या अनुषंगाने तातडीने नियमानुसार कार्यवाही करण्यात यावी व उपोषण कर्त्याना उपोषणा पासून परावृत्त्त करावे व या प्रकरणात कयदा व सुव्यवस्था भंग होणार नाही. याबाबत दक्षता घ्यावी असे आदेश दिले आहेत. तर शेख करीम शेख रशिद यांनी स्वतः शेतात गट नं.678 भाग-2 मधील जमीन विकत घेतली (0.81) हे.आर त्या जमिन मध्ये विहीर खोदली व सरकारी योजनेतून लाईन आणली मात्र त्या विहीरीची नोंद सातबाऱ्यावर तलाठी घेत नाही म्हणून हि नोंद न घेणाऱ्या व फेरफार न देणाऱ्या तलाठी यांच्यावर तत्काळ कारवाई करावी व विहिरीची नोंद करावी यासाठी शेख करीम शेख रशिद हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणास बसले असून त्यांच्या या उपोषणाला महाराष्ट्र मुस्लिम बक्कर खाटीक संघटना बुलडाणा चे संस्थापक अध्यक्ष सलीम महेमुद, अब्दुल मन्नान, म. हनिफ यांनी उपोषणाला भेट देऊन जाहीर पाठिंबा देत त्यांनी जिल्हाधिकारी यांना लेखी पत्र देऊन त्यात नमूद केले आहे की, शेख करीम शेख रशिद रा.साखरखेर्डा त्यांच्या गट नं. 678 भाग-2 मधील 0.81 हे. आर जमिन विकत घेतली होती त्यामध्ये त्यांनी स्वकष्टाने विहीर खोदलेली आहे. तसेच सरकारी निधीतून विहीरी व डी.पी,सहा खांबे मिळालेले आहे. शासनाच्या अनुदानातुन इलेक्टीक मोटार व पेट्रोल पंप व नांगरण्यासाठी डवरे देखील मिळाले आहे, असे असतानाही त्यांना मिळत नाही, तरी त्यांना न्याय मिळावा यासाठी जिल्हाधिकारी यांना रीतसर निवेदन देण्यात आले आहे.
शेख करीम शेख रशिद यांच्या उपोषणाची जर जिल्हा प्रशासनाने तत्काळ दखल न घेतल्यास त्यांना न्याय मिळावून देण्यासाठीच नाईलाजास्तव महाराष्ट्र मुस्लिम बककर खाटीक संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व होणाऱ्या परिणाम व कायदा सु व्यवस्था बिघडल्यास प्रशासन व सबंधित सर्व जबाबदार असतील असा इशाराही अध्यक्ष म.सलीम शे.महेमुद यांनी आपल्या निवेदनात दिला आहे. तर गृहविभाग शाखा प्रमुख जिल्हाधिकारी कार्यालय बुलडाणा यांच्या पत्राला महसूल अधिकारी बुलडाणा व सिंदखेड राजा तहसिलदार शेख करीम शेख रशिद यांच्या उपोषणाची कशी दखल घेतात व काय कार्यवाही करतात या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
* उपोषणाला महाराष्ट्र मुस्लिम बक्कर खाटिक संगटनेचा पाठिंबा
जिल्हा प्रशासनाने शेख करीम शेख रशिद यांच्या उपोषणाची तत्काळ दखल घेऊन उपोषण कर्त्यास न्याय मिळवून द्यावा जर प्रशासनाने दखल न घेतल्यास महाराष्ट्र मुस्लिम बक्कर खाटिक संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशाराही सलीम शे महेमुद यांनी एका निवेदनाव्दारे दिला आहे.
