लोणार धारातीर्थ पवित्र स्नानासाठी खुले व्हावे * १००१ लोकांच्या साक्षरी निशी निवेदनाद्वारे मागणी

लोणार धारातीर्थ पवित्र स्नानासाठी खुले व्हावे 
*  १००१ लोकांच्या साक्षरी निशी निवेदनाद्वारे मागणी 
लोणार : (एशिया मंच वृत्त)
       गेल्या काही दिवसांपासून मी लोणारकर टीमचे सदस्य यांनी लोणार धारातीर्थ पवित्र स्नानासाठी खुली व्हावी म्हणून लोकांमध्ये जाऊन स्वाक्षरी मोहीम चालू केली होती. स्वाक्षरी मोहीम मे  महीन्या दरम्यान हजार च्या वर या स्वाक्षरी झाल्यात 50-60 पाने भरली आहेत.या स्वाक्षरी सोबत आपण आपली श्रद्धा असलेली लोणार धारातीर्थ चे निवेदन जोडले होते. ते नुकतेच मी लोणारकर टीमने भारतीय पुरातत्व विभागाच्या ASI अधिकारी (Conservation Assistant) शुभम अरजारिया यांच्या मार्फत  ते प्रधानमंत्री कार्यालय दिल्ली,  मुख्यमंत्री कार्यालय मुंबई महाराष्ट्र, भारतीय पुरातत्व विभाग दिल्ली,  सांस्कृतिक कार्य मंत्री भारत सरकार, सांस्कृतिक राज्य कार्य मंत्री भारत सरकार, पर्यावरण मंत्री महाराष्ट्र, महानिदेशक भारतीय पुरातत्व सर्वेक्षण नवी दिल्ली
या सर्वांपर्यंत पोहोचवलेले आहे. लवकरच आपली धार पुन्हा पूर्वी प्रमाणे चालू होईल असे आम्हांला पुरातत्व विभाग नागपूर सर्कल चे (Superintending Archaeologist) अधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ अरुण मलिक यांनी फोन वर बोलताना सांगिले. श्रावण महिन्यात या 
तीर्थस्थानाला मोठे महत्व आहे शिवाय या महिन्यात अनेक कावडी यात्रेकरू येथे येतात व शिव आराधना करतात. परंपरेनुसार गजानन महाराज पालखी येथेच स्नान करून आपला आनंदमई प्रवास करतात तसेच दशिहार हा दहा दिवसांचा भाविकांचा अस्थेचा विषय आहे तेव्हा हे पवित्र स्नान महत्वाचे मानले जाते.
   यावेळी निवेदन देताना पर्यावरण प्रेमी मी लोणारकर टीम चे सचिन  कापुरे,  विलास जाधव, प्रकाश सानप, सर्पमित्र विनय कुलकर्णी, रोहन सोसे, विजय गोरे व इतर हजार लोकांच्या सह्या या निवेदनावर आहेत.