पहूर येथे नवीन डाक घरचे अधीक्षक अंभोरे याच्या हस्ते उद्घाटन


पहूर येथे नवीन डाक घरचे अधीक्षक  अंभोरे याच्या हस्ते उद्घाटन 
लोणार : (एशिया मंच वृत्त)
      बुलडाणा जिल्ह्याच्या अगदी शेवटच्या टोकावर असलेल्या अतिशय दुर्गम भागात भारतीय डाक विभागाच्या विविध योजनांचा प्रचार व प्रसार होण्यासाठी व ग्रामीण भागातील लोकांना आर्थिक साक्षर होण्याच्या दृष्टीने व ग्रामीण भागातील नागरिकांना बचतीची सवय निर्माण व्हवी, या उद्देशाने भारत सरकार मार्फत बुलडाणा डाक विभागाच्या वतीन लोणार तालुक्यातील  पहूर येथे वित्तीय समावेशन योजेअंतर्गत  22 ऑगस्ट 2023 रोजी 
 बुलडाणा जिल्हा डाक अधीक्षक गणेश अंभोरे याच्या हस्ते भारतीय डाक घर शाखा पहूर शाखेचे उद्घाटन करण्यात आले.
      यावेळी डाक अधीक्षक गणेश अंभोरे  यांनी विविध (पोस्ट ) डाक विभागाच्या योजनाची माहिती दिली. मेहकर उपविभागीय डाक निरीक्षक गजानन काळे यांनी पीएम किसान योजना , सुकन्या समृध्दी ठेव योजना, महिला बचत पत्र योजनाची माहिती दिली.
      बुलडाणा जिल्हा डाक विमा विकास अधिकारी गजानन घुगे यांनी डाक विमा योजना , ग्रामीण डाक विमा योजना, जनरल विंमा योजनाची माहिती दिली. यावेळी पहूर येथील सरपंच अंकूश मुंडे, जिल्हा डाक अधीक्षक गणेश अंभोरे, उपविभागीय डाक निरीक्षक गजानन काळे , डाक विमा विकास अधिकारी गजानन घुगे , डाक विमा प्रतिनिधी किशोर मोरे, डाक मेल ओव्हरशियल विष्णू काळूसे ,शाखा डाक पाल प्रकाश मुळे, मिलिंद दिपके, केंद्र प्रमुख संतोष मुंडे ,वायाळ सर, सांगळे सर ,लक्ष्मण पोघे,
 रामदास दीपके , कुंडलिक मार्कड, ग्रा.प. सदस्य सह पहूर येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
* पहूर गावासाठी अभिमानाची बाब आज पासून मु. पोस्ट पहूर या नावाने ओळखल्या जाणार गावातील सर्व नागरिकांना पोस्ट ऑफिस कोणत्या ही गावाला मिळत नाहीं आपल्या गावाचं भाग्य म्हणावं लागेल, गावातील सर्व ग्रामस्थाना आपल्याला आपले खाते पोस्ट ऑफिस मध्ये व्यवहार पोस्ट ऑफिस मधून करून पोस्ट ऑफिस ला  सर्व ग्रामस्थानी सहकार्य करावे
* अंकूश मुंडे सरपंच ग्रामपंचायत पहूर