* विद्यार्थ्यांनी मोठे ध्येय समोर ठेवावे : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
विद्यार्थ्यांनी छोटे ध्येय बाळगण्या पेक्ष्या ध्येय उंच ठेवावे, मोठे ध्येय पूर्ण करायचे असल्यास व्यक्तित्व, कर्तृत्व तेव्हढेच महत्त्वाचे आहे , सोबतच चांगले गुण आपल्यात आणणे देखील आवश्यक आहे, केंद्रीय नितीन गडकरी यांनी सहकार विद्या मंदिर च्या नवीन शालेय इमारत चे उद्घाटन प्रसंगी उदगार काढले.
पुढे बोलताना केंद्रीय नितीन गडकरी म्हणाले की, आपल्या व्यक्तिमत्वात नम्रता, शालीनता, सरळता, सौजन्यता असणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांसमोर सांगितले.
यावेळी मंचकावर बुलडाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटीचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक, उपाध्यक्ष किशोर केला, सीएमडी डॉ. सुकेश झंवर, अध्यक्षा कोमल झंवर, खा. प्रताप जाधव, आ. संजय गायकवाड, आ. संजय कुटे, आ. संजय रायमुलकर, आ. श्वेताताई महाले, माजी आ. चैनसुख संचेती, विजयराज शिंदे आदिंची उपस्थिती होती.
यावेळी गडकरींनी जीवन आनंदाचे जगा, संघर्ष आहे. तुम्ही कसे वागता यावर सगळे अवलंबून आहे, असेही सुचित केले. माझ्या स्वभावात कोणाची तारीफ करायची सवय नाही व एखादी गोष्ट आवडली नाही ठोकून बोलण्याचीही आपली सवय नसल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना भाईजी चांडक म्हणाले की, जशी आपण भारतात , रस्त्याची क्रांती केली तशी भारतात शैक्षणिक क्रांतीची आवश्यकता आहे असे सांगून विद्यालयाची वाटचाल विषद केली.
