चिखली : (एशिया मंच वृत्त)
महाराष्ट्र शासनाच्या नामवंत बार्टी संस्थेच्या वतीने समतादूत मोहसिन खान बिसमिल्ला खान यांच्या हस्ते सीसीएनचे मुख्य संपादक गोपालभाऊ तुपकर यांना भारतीय संविधान प्रत भेट देण्यात आले. लोकशाहीचे महान तत्त्वचिंतक ठरलेल्या महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला जे संविधान दिले आहे, ते अतुलनीय आणि जगातील सर्वश्रेष्ठ संविधान ठरले आहे. भारतीय संविधानाने जी मूल्ये दिली आहेत, ती संविधानिक मूल्ये केवळ भारतालाच नव्हेतर, संपूर्ण जगाला मार्गदर्शक आहेत. तसेच वैश्विक स्तरावर भारतीय संविधानाचे सर्वश्रेष्ठ संविधान असे महत्त्व सिद्ध होत आहे. त्यामुळे संविधानाचे ज्ञान व्हावे, कायद्याची माहिती व्हावी या हेतून संविधान प्रतचे वाटप करण्यात आले.
