बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
होमगार्ड बांधवांच्या अनेक समस्या आहेत. कामाच्या तुलनेत त्यांना अपुऱ्या सुविधा मिळतात. शासनाने याकडे लक्ष दिले पाहिजेत. याबाबत पाठपुरावा करुन होमगार्डना न्याय मिळवून देऊ, असे अभिवचन राजर्षी शाहू सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संदिपदादा शेळके यांनी दिले.
चिखली येथील समादेशक अधिकारी कार्यालय होमगार्ड पथक येथे ८ मे २०२३ रोजी होमगार्ड बांधवांशी त्यांनी चर्चा करुन समस्या जाणून घेतल्या. महिला होमगार्ड यांनीही त्यांच्याकडे आपल्या व्यथा मांडल्या. बरीच वर्षे सेवा झाली तरी ड्युटी मिळत नसल्याची खंत महिला होमगार्ड यांनी व्यक्त केली. याबाबत संबधीत यंत्रणेकडे पाठपुरावा करु, असे आश्वासन संदीपदादा शेळके यांनी दिले. यावेळी चिखली तालुका होमगार्ड समादेशक शिवाजी साळोक, पथकातील सैनिक विजय खेडेकर, आत्माराम वखरे, गणेश खेडेकर, मधुकर इंगळे, संदीप अंभोरे, उमेश इंगळे, राजू नरवाडे, गजानन वरपे, रवी तवर, दीपक मोरे, राजू गवंदे, गजानन धुडकेकर, गजानन साळवे,आशाबाई गवई, पुष्पाबाई उगले, ज्योती घुगे, जयश्री शिंदे आदी उपस्थित होत्या.
* होमगार्ड दुर्लक्षित घटक :
कुठलाही बंदोबस्त असला की, आपणास आघाडीवर होमगार्डस दिसतात. समाजात शांतता कायम ठेवण्यासाठी हा घटक झटतांना आपण पाहतो. मात्र त्यातुलनेत त्यांना सुविधा मिळत नाहीत. मान, सन्मान मिळत नाही. तुटपुंजे मानधन दिल्या जाते. तरीही होमगार्ड कुरबुर करीत नाहीत. होमगार्ड दुर्लक्षित घटक असून त्यांच्या समस्याबाबत पाठपुरावा करु, असे संदीपदादा शेळके यांनी सांगितले.
* अशा आहेत प्रमुख मागण्या :
होमगार्डचे अनेक प्रश्न आहेत. अनेक दिवसांपासून त्यांच्या मागणी प्रलंबित आहेत. होमगार्डला ३६५ दिवस ड्युटी मिळायली हवी, दर तीन वर्षांनी होणारी पूर्णनोंदणी रद्द व्हावी, प्रतिवर्षी गणवेष साहित्यासाठी ४ हजार रुपये मिळावे, पोलीस भरतीत १० टक्के आरक्षण द्यावे आदी प्रमुख मागण्या आहेत. शासनाने यादृष्टीने सकारात्मक निर्णय घ्यायला हवा.
