* चिखली तालुक्यातील पेठ येथील घटना
चिखली : (एशिया मंच वृत्त)
खामगाव-चिखली रस्त्यावरील पेठ जवळील पैनगंगा नदीच्या पुलावरून लक्झरी बस नदीत कोसळली. ९ मेच्या मध्यरात्री हा भीषण अपघात झाला. या अपघातात लिलाबाई विष्णू भुट्टे ६५ रा. वडशिंगी ता. जलगाव जामोद व संगीता निवृत्ती ठाकरे ४१ रा. धापटी ता. खामगाव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
प्राप्त माहितीनुसार बाबा ट्रॅव्हलची बस क्रमांक यूपी 78 fn 4662 जळगाव जामोदवरून पुण्याकडे जात होती. पेठ जवळच्या अरुंद पुलावरून ही बस नदीपात्रात कोसळली. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अमडापुर आणि चिखली पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील जखमींना तात्काळ चिखलीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अधिक तपास चिखली पोलीस करीत आहेत.
