4 बाजार समित्यांवर महाविकास आघाडीचा फडकला झेंडा ; लोणार बाजार समिती शिंदे गटाकडे

4 बाजार समित्यांवर महाविकास आघाडीचा  फडकला झेंडा ; लोणार बाजार समिती  शिंदे गटाकडे 
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
       जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीची 5 ठिकाणी निवडणुका घेण्यात आल्या. यामध्ये चिखली, लोणार, जळगाव जामोद, शेगाव आणि नांदुरा या बाजार समित्यांसाठी 30 एप्रिल रोजी  मतदान पार पडले. 
      या पाच ठिकाणीही शांतेत मतदान पार पडले. असून मतमोजणी याच दिवशी झाली असून  महाविकास आघाडीच्या नेतृत्वातील पॅनलची सरशी झाली आहे. शिंदे गट व भाजपच्या आमदारांचा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नियोजनूर्वक काम करून मतदान करणाऱ्या मतदार राजाशी त्यांचे प्रश्न एकूण ते सोडवू असे विश्वास त्यांना दिले. तसेच ते कसे पूर्ण करू हे पटवून दिल्यानेच मतदार राजाने महविकास आघाडीला मतदान रुपी आशिर्वाद दिल्याचे हे स्पष्ट झाले आहे. तर शेगाव बाजार समितीवर महाविकास आघाडी च्या पॅनलने बाजी मारली असून, एकहाती सत्ता मिळवत भाजपचे आ. संजय कुटे यांना झटका दिला आहे. तर लोणारमध्ये खा. प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वातील पॅनलने  सत्ता मिळावली. येथे शिंदे गटाला 15 जागा मिळाल्या असून, महाविकास आघाडीच्या नेतृत्वातील पॅनलला 3  जागा मिळाल्या आहेत. चिखलीत आ. श्वेताताई महाले यांच्या सहकार परिवर्तन पॅनलला मतदारांनी धूळ चारली आहे. तर महाविकास आघाडीच्या नेतृत्वातील बळीराजा पॅनलने 18 पैकी 17 जागा जिंकून बाजार समितीची सत्ता पुन्हा एकदा ताब्यात घेतली आहे. येथेही मतदार राजाने महविकास आघाडीवर विश्वास दिल्याने त्यांच्या हाती सत्ता दिली. पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे डॉ.राजेंद्र शिंगणे, राहुल बोंद्रे, नरेंद्र खेडेकर, जालिंदर बुधवंत हे किंग मेकर ठरले. तर दुसरीकडे  भाजपच्या आ. श्वेताताई महाले यांचा बाजार समिती वर सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न असफल राहिला. त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली होती.  परंतु मतदारांनी त्यांना साफ नकारल्याचे दिसून येत आहे. नांदुरा व जळगाव जामाेद बाजार समित्यांतही महाविकास आघाडीचीच सत्ता आली आहे. पाचपैकी फक्त एक बाजार समिती  शिंदे गटाला यश आले असून, चार बाजार समित्यांवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे. तर या निवडणुकीत भाजपच्या मोठ-मोठे आश्वासनाला बळी न पडता मतदारांनी त्यांना दूर करून महविकास आघाडीला पसंत केल्याचे या निकालावरून दिसत आहे.