परिनिर्वाण : बुलडाण्याचं चित्रपट निर्मिती क्षेत्रात दमदार पाऊल

परिनिर्वाण : बुलडाण्याचं चित्रपट निर्मिती क्षेत्रात दमदार पाऊल
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
       विदर्भात चित्रपट निर्मितीसाठी फारसा वाव नाही असं म्हटलं जातं. हे पुण्या मुंबईकरांचे काम असं म्हणून विदर्भय माणूस चित्रपटापासून चार हात दुर राहतात. त्यातही विदर्भातील बुलडाणा जिल्हा आणि इथे चित्रपट निर्मितीचा विचार करने अशक्य कोटीतली गोष्ट. मात्र सुनील शेळके बुलडाणा यांनी परिनिर्वांनाच्या माध्यमातून दमदार पाऊल या क्षेत्रात टाकले आहे.
      डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाची परिनिर्वाण यात्रा आपल्या कॅमेरा टिपणाऱ्या नामदेव व्हटकर या छायाचित्रकाराची संघर्ष गाथा या चित्रपटाच्या माध्यमातून पुढे येत आहे. मोठ्या पडद्यावर बिग बजेट चित्रपट करणे ही बुलडाणा जिल्ह्यातील पहिली घटना असावी.
       बुलडाणा येथे उपजिल्हाधिकारी राहिलेले सुनील शेळके हे वेगळं रसायन आहे. कमी बोलून अधिक काम करणे हा त्यांचा पिंड. पुरोगामी विचारसरणी हा त्यांचा मूळ स्वभाव. त्यांच्या पत्नी एडवोकेट जयश्रीताई शेळके एक झुंजार नेतृत्व म्हणून राज्याला परिचित आहे. ज्या क्षेत्रात जावे तिथे आपल्या कामाचा ठसा उमटून ते काम शिखरावर नेण्याचे काम सुनील शेळके यांनी आजवर केले आहे. चित्रपट निर्मितीमध्ये त्यांनी आज पाऊल टाकले आहे. खरे तर हा आरंभ आहे. त्यांच्या स्वभावप्रमाणे पुढे हे क्षेत्र देखील ते आपलेसे करणार यात शंका नाही.
       डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निर्वाण झाले त्यांची अखेरची महापरिनिर्वाण यात्रा चिरकाल स्मरणात राहावी यासाठी नामदेव व्हटकर या छायाचित्रकाराने प्रचंड मेहनत घेतली. यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला. परिस्थिती अनुकूल नव्हती त्यामुळे कुठे फारशी मदत मिळेल अशी अपेक्षा नसताना व्हटकर स्वतःच्या हिमतीवर पुढे आले. त्यांचा संघर्ष हाच या चित्रपटाचा मुख्य आशय आणि विषय आहे. नामदेव व्हटकर हे नाव लेखक ,कलावंत वैचारिक उंची असणाऱ्या व्यतिरिक्त फारस कोणाला परिचित नाही. विस्मृतीत गेलेला हा विषय निवडून त्यावर चित्रपट निर्मिती करणे, त्याला उजाळा देणे यावरून सुनील शेळके यांची नाळ देखील कुठे जोडली आहे हे स्पष्ट होते. शेतकरी समाजामध्ये परंपरावादी लोकांचा भरणा अधिक आहे. मात्र छत्रपती राजर्षी शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड ,जेधे,जवळकर अशी माणसही दीपस्तंभासारखी राहिले. बुलडाणा जिल्हा तसाही नवविचार देणार आहे. जिजाऊंचा विचारावर पुढे इतिहास उभा राहिला. ताराबाई शिंदे ,पंढरीनाथ पाटील यांचे विचार आजही पथदर्शी आहे. साजन चित्रपटाचे निर्माता सुधाकर बोकाडे हे देखील सिंदखेड लपाली सारख्या छोट्या गावातून पुढे आलेआहे. तर यशाचा ब्रँड झालेल्या सुनील शेळके यांनी या क्षेत्रात दमदार पाऊल टाकून एक नवी सुरुवात केली आहे.

 * कोण आहेत व्हटकर : 
      डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अखेरची महापरि निर्वाण यात्रा चित्रीत करणारे नामदेव व्हटकर हे छायाचित्रकार होते. जातीभेद व अस्पृश्यतांअंतासाठी त्यांनी हयातभर काम केले. काँग्रेसच्या तिकिटावर उभे राहून पुढे ते आमदारही झाले. त्यांची भूमिका अभिनेता प्रसाद ओक साकारणार असून शैलेंद्र बागडे दिग्दर्शक आहे. अभीता फिल्म व कल्याणी पिक्चर्स द्वारा सुनील शेळके ही निर्मिती करीत आहे. पुरोगामी चळवलीतिल सक्रीय कार्यकर्ते ,कार्यक्षम प्रशासकीय अधिकारी, यशस्वी उद्योजक म्हणूनअभिता लँड सोल्यूशन कंपनीच्या माध्यमातून सुनील शेळके यांनी आपला परिचय मुंबइसह पूर्ण राज्यभर दिला आहे. तर आता चित्रपट निर्माता म्हणून देखील त्यांनी पाऊल टाकले आहे.

* गणेश निकम केळवदकर