स्व. अनुराधाताईच्या स्मृती दिनानिमीत्त नेत्र शिबीराचा हजारो रूग्णांनी घेतला लाभ* 29 जुन रोजी मोफत चष्म्याचे वाटप * शस्त्रक्रेयेस पात्र ठरलेल्या रुग्णाची 4 मे रोजी जळगांव येथे शस्त्रक्रीया


स्व. अनुराधाताईच्या स्मृती दिनानिमीत्त नेत्र शिबीराचा हजारो रूग्णांनी घेतला लाभ
* 29 जुन रोजी मोफत चष्म्याचे वाटप 
* शस्त्रक्रेयेस पात्र ठरलेल्या रुग्णाची  4 मे रोजी  जळगांव येथे शस्त्रक्रीया 
चिखली : (एशिया मंच वृत्त)
गेल्या  32 वर्षापासुन अविरतपणे ‘रूग्णसेवा हिच ईष्वर सेवा’ समजुन तपासणी बरोबरच उपचारासाठी सातत्यपुर्ण आरोग्य विषयक विविध शिबीरांचे आयोजन अनुराधा मिशनच्या माध्यमातुन कर्मयोगी स्व.तात्यासाहेब बोंद्रे यांचा शिवभावे जिवसेवेचा वसा माजी आमदार राहुलभाऊ  बोंद्रे हे अवीरतपणे पुढे चालवित आहेत. अनुराधा मिशनच्या माध्यमातुन आजवर विविध आजारांच्या शेकडो शिबीरांचे यशस्वी झाले असुन त्यात लाखो रूग्णांनी लाभ घेतला.  आजवरच्या रूग्नसेवेच्या कार्यातुन असंख्ये अंधारलेल्यांचे जिवन प्रकाशमय झाल्याचे प्रतिपादन बुलडाणा येथील नामवंत नेत्र चिकीत्सक डॉ. विकास बाहेकर यांनी केले. स्व. अनुराधाताई बोंद्रे यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने  1 मे 2023 रोजी संपन्न झालेल्या भव्य निशुल्क नेत्र चिकित्सा शिबीराला माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांनी उपस्थित राहुन महिला व पुरूष रूग्णांची आस्थेने विचारपुस केली हे विशेष.          स्व. अनुराधाताई यांच्या स्मृती प्रित्यार्थ दरवर्षी 1 मे रोजी गेल्या 32 वर्षापासुन विविध आरोग्य विषयक शिबीरांचे आयोजन अनुराधा मिशनच्या माध्यमबतुन करण्यात येत आहे. यावर्षी आयोजित करण्यात आलेल्या या नेत्र तपासणी  शिबीराचा तालुक्या भरातुन आलेल्या गरजु रूग्णांनी लाभ घेतला. यामध्ये 2840 रूग्णांच्या विविध नेत्र तपसण्या करण्यात आल्या, तर 1690 रूग्णांची चष्म्ये वाटपकरीता निवड करण्यात आली. त्यांना 29 जुन रोजी मौनीबाबा संस्थान येथे मोफत चष्म्याचे वाटप करण्यात येणार आहे. यावेळी झालेल्या तपासणी अंती सुमारे 277 रूग्ण शस्त्रक्रेयेस पात्र ठरले असुन येत्या 4 मे रोजी गोदावरी फाउंडेशन जळगांव येथे शस्त्रक्रीया करण्यात येणार आहे. या शिबीर   प्रसंगी जिल्हाभरातुन आलेल्या नामवंत चिकित्सक मंडळीत डॉ. विकास बाहेकर बुलडाणा, डॉ. सोमटकर, डॉ. राहुल जोशी  चिखली, डॉ. शेटे, डॉ. विवेक आडावे, डॉ. दिपाली पाटील, डॉ. देवकर, डॉ. बंगाळे चिखली, डॉ. ज्योत्सना गुल्हाने, डॉ.कुलदिप भोलाने, डॉ. अजय वाघमारे, डॉ. अतहर्व, डॉ. पालवे, सतिष क्षिरसागर, वृषाली गवई, डॉ. कल्पना इंगळे, डॉ. प्रिती बाहेकर, डॉ. शोभना काळे, राजेश्री भुईभार, डॉ. जगदीष बाहेकर, डॉ. उदयसिंग राजपुत, डॉ. अनिलसिंग पवार, डॉ. राजेंद्र सवडतकर, डॉ. सुरेष गि-हे, डॉ.प्रगती पासते, डॉ. रोहीणी चव्हाण, डॉ. देवकुमार शहा, डॉ. पुजा, डॉ. षिल्पा गुफे, डॉ. कार्तीक वाघामरे, डॉ. तोडकर, डॉ. संजय पाटील, डॉ. चिंचोले, डॉ. जिवने, डॉ. षिंदे, डॉ. काळे मॅडम, डॉ. शेंडे मॅडम, डॉ. चेतन झाडोकर, डॉ.उल्हास पाटील रूग्णांलयाचे श्री महाजन यासह दिनेष वाणी, दिप्ती वाणी, अषोक लागे शेगांव, जी.व्ही. ठक संग्रामपुर, अक्षय पाटील, शरद पाटील, कृष्णा मोदे, ईष्वर सरनाईक, विषाल सुरडकर, आर.एस.सिरसाट, षिवनकर, विजय सिरसाट, चौथनकर, यांनी रूग्णांना सेवा दिली. तर या षिबीर प्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका अधिकारी, ग्रामीण रूग्णलय चिखली यांचे विशेेष सहकार्य लागले. तर आनंद मेडीकलचे संचालक  विनोद नागवाणी यांनी डोळयांचे 700 ड्रॉफ मोफत उपलब्ध करून दिले.  
       या शिबीर प्रसंगी माजी आमदार राहुलभाऊ  बोंद्रे,  सिध्देष्वर वानेरे, आत्माराम देशमाने, दिपक देशमाने, जितेंद्रदादा बोद्रे, वर्धमानसेठ डहाळे, बिदुसिंग इंगळे, विनोद नागवाणी, पंढरीनाथ टेकाळे, यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिीती होती तर प्राचार्य डॉ.अरूण नन्हई, प्राचार्य डॉ. कैलास बियाणी, डॉ. रविंद्र काळे, डॉ. पागोरे, प्रा. उन्मेष जोषी, प्रा. कुलकर्णी, अनुराधा अर्बनचे नितीन गायके, हिरकणीचे संदिप भावसार, डॉ. मेणका, प्रा. सोफिया, डॉ. कुडके, यांच्यास अनुराधा मिशनच्या पदाधिकारी व कर्मचा-यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले. नेत्र  शिबीराचे सुत्रसंचलन व आभार प्रर्दषन प्रा.उन्मेष जोशी यांनी केले.
मानसातल्या ईश्वराच्या  सेवेतुन जनकल्याण करण्याचा कर्मयोगी स्व. तात्यासाहेबांचा संदेश  - राहुलभाऊ बोंद्रे
 
  आपला आनंद, ईच्छा, आकांक्षांवर तुळशीपत्र ठेवुन, आगोदर जनकल्याण करा आणि मानसातल्या ईष्वराची सेवा करा हाच मौलीक संदेश आमचे वडील ऋषीतुल्य कर्मयोगी स्व. तात्यासाहेब बोंद्रे यांनी आम्हांला दिला आहे. स्व. अनुताईंच्या स्मृती दिना निमित्त 1 मे रोजी गत 32 वर्षापासुन अनुराधा मिशन व अनुराधा परीवाराच्या वतीने भव्य नेत्र चिकित्सा  शिबीरे आयोजित करण्यात येतात. या शिबीरांच्या माध्यमातुन अनुराधा परीवाराने 2 लाखाच्या वर नेत्र रूग्णांची शुश्रुषा, शस्त्रक्रीया, दिव्यांगाची तपासणी, जयपुर फुट जोडणी, तथा शस्त्रक्रीया, करून हजारो गरीब आणी सामान्य कुटूंबातील अबाल ते वृध्दांपर्यत सर्व गरजु रूग्णांना मोफत ओैषधी, चष्मे वाटप, तसेच गरजु व पात्र रूग्णांवर विनामुल्य शस्त्रक्रीया करण्यात आली आहे. आमच्या बोंद्रे परीवाराचा रूग्णसेवेचा वारसा हा अखंड सुरू राहो ही श्रुष्टी निर्मात्यास सहद्य प्रार्थना करत असल्याची याप्रसंगी प्रतिक्रीया माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांनी दिली.