बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
संवेदना प्रतिष्ठानच्या वतीने स्थानिक गांधी भवन येथे २३ एप्रिल रोजी बौद्ध वधू - वर परिचय मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा कौटुंबिक न्यायालयाचे समुपदेशक जगन्नाथ कांबळे उपस्थित होते. मेळाव्याचे उदघाटन राजमाता अहिल्याबाई होळकर पुरस्कारप्राप्त संध्याताई इंगळे यांच्याहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजाराम गवई होते.
सामाजिक, कौटुंबिक व आर्थिक विवंचनेतून समाज जात असताना, शिक्षण, नोकरी, व्यवसाय व वय या सारख्या अटीशी तडजोड करणे आवश्यक आहे त्या शिवाय पर्याय नाही तर असे मेळावे ही सामाजिक गरज असल्याचे प्रतिपादन संध्या इंगळे यांनी स्पष्ट केले. अध्यक्षीय भाषणात राजाराम गवई यांनी संवेदना प्रतिष्ठानचा कार्यक्रम संवेदना प्रतिष्ठानचे उपक्रमशील सभासद कालकथित प्रा.गौतम अंभोरे यांना समर्पित केल्याचे सांगून, त्यांच्या कार्याचा उल्लेख केला. सुरवातीला प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापुजन व दीप प्रज्वलित करण्यात आले. प्रास्ताविक प्रभाकर गवई यांनी केले तर संचालन प्रा.प्रशांत इंगळे यांनी केले.
वधू - वर मेळाव्याचे परिचय पत्राचे वाचन विजयकुमार क्षीरसागर व कैलास मोरे केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व तालुका समन्वयक बी.के.इंगळे, प्रदीप हिवाळे, संतोष कदम, बाबासाहेब कासारे, मधुकर सरकटे, निवृत्ती तायडे, राजवर्धन शेगोकार, अरविंद तायडे, प्रा.के.बी.इंगळे, प्रा.सी.डी.कंकाळ, प्रा.पी.ए.मोरे सुरेश सरकटे, विलास भारसाखळे सर , सुरेश गवई सर, रत्नाकर भिलेंगे, गुलाबराव गवई, तुकाराम रोकडे सर, प्रदीप साळवे सर इत्यादी मान्यवरांनी परिश्रम घेतले .
कार्यक्रमाचे आयोजन करण्यापासून ते नांव नोंदणी पर्यंतच्या सर्वच कामात प्रा.लक्ष्मण कंकाळ, चंद्रकांत आराख, श्रीधर जाधव, खंडारे सर, संदीप मोरे, आयु.सुभाष झीने सर, नंदकुमार खोडके यांनी सहभाग घेतला तर प्रसिध्दी प्रमुख म्हणून संजय जाधव पत्रकार साम टिव्ही यांनी आपली भूमिका उत्कृष्टपणे पर पाडली. कार्यक्रमाचा समारोप व आभार प्रदर्शन प्रा.माणिकराव गवई सर यांनी केले.
