वाशिम मध्ये रंगली बहारदार संगीत मैफिल.....* स्व.लता दीदी यांना वाहण्यात आली श्रध्दांजली

वाशिम मध्ये रंगली बहारदार संगीत मैफिल.....
* स्व.लता दीदी यांना वाहण्यात आली श्रध्दांजली
वाशिम : (एशिया मंच वृत्त)
         बुलढाणा अर्बन क्रिएटिव्ह ग्रुप तथा सप्तसुर म्युझिकल ग्रुप कारंजा लाड प्रस्तुत "जाने क्या बात है" ( एक शाम लताजी के नाम) या संगीत कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच  स्वागत लाँन्स वाशिम येथे संध्याकाळी 7 वाजता करण्यात आले होते.
        सदर कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून वाशिम पोलीस स्टेशनचे पोलीस उपअधीक्षक पुजारी, वाशिम शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शेख रफिक, बुलढाणा अर्बन वाशिम विभागाचे पालक संचालक नंदकिशोर झंवर, बुलढाणा अर्बन वाशिमचे स्थानिक संचालक डॉ. हरीश बाहेती, तसेच संस्थेचे सरव्यवस्थापक कैलास कासट हे होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेचे पुजन व दिप प्रज्वलन करण्यात आले.
       कार्यक्रमात सुप्रीद्ध गायक अनंताभाऊ देशपांडे (व्हाईस ऑफ लता) यांनी लतादीदींच्या आवाजात लताजींच्या अजरामर गीते गाऊन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. स्व.लतादिदी यांच्या सदाबहार गीतांचा नजराणा प्रेक्षकांन पुढे ठेऊन लतादिदी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमाचे व्यवस्थापन  उमेश आजनकर , संगीत संयोजन  प्रशांत ठाकरे , नृत्य दिग्दर्शन- प्रकाश मेश्राम, विशेष सहकार्य - शेख मोबिन यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाशिर खान मुंबई यांनी केले. तसेच गायिका गौरी शिंदे, शेख मोबीन, बुजरूक सर, उमेश आजनकर ,आकाश सारवान, सुभाष साबळे यांनी सुंदर गीते सादर केली.
       संगीत संच- प्रशांत ठाकरे, रामेश्वर काळे,वीरेंद्र गावंडे, जानराव देहाडे, अभिजित भावे,मनीष आत्राम,विशाल पांडे, राजदीप चावरे ,आणि उत्कृष्ट कोरस, या सर्व कलाकारांनी कार्यक्रमाला रंगत चढविली. कार्यक्रमात पोलीस उपाधिक्षक पुजारी, रफिक शेख निरीक्षक शहर पोलीस स्टेशन वाशिम, स्थानिक संचालक डॉ हरिश बाहेती, राजुभाऊ लाहोटी , शशिकांत दंडवते ,विशाल वानखेडे, मिठुभाऊ शर्मा, अमोल शिंदे,मोहन दलाल , सुधीर भालेराव , विठ्ठल दळवी, कैलास मोरे , शैलेश कुलकर्णी,संजय कस्तुरे, यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचा असंख्य श्रोत्यांनी मनमुराद आस्वाद घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता अमोल शिंदे विभागीय व्यवस्थापक वाशिम, संजय रंधवे, प्रमोद बंग व सर्व कर्मचारी वर्ग बुलडाणा अर्बन वाशिम यांनी प्रयत्न केले.