बी. पी. मंडल यांना अभिवादन

बी. पी. मंडल यांना अभिवादन
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
         क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समितीद्वारा 13 एप्रिल 2023 रोजी येथील महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक शाळेत आयोजित रक्तदान शिबिरामध्ये मंडल आयोगाचे अध्यक्ष बी.पी. मंडल यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. 
      याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. बी.पी. मंडल यांच्या कार्याविषयी ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाचे राज्य सल्लागार डॉ. शिवशंकर गोरे यांनी विस्तृत माहिती दिली. याप्रसंगी संयुक्त जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रा.सदानंद माळी, महिला अध्यक्ष प्रियंका सुरोशे, प्रिती डांगे, वंदना निलकंठ, महात्मा फुले मंडळाचे अध्यक्ष प्रकाश वानेरे, सचिव इंजि.सुरेश चौधरी, ऍड. शरद राखोंडे, प्रकाश पांडव, प्रशांत मोरे, मधुसूदन सपकाळ, प्रदिप डांगे, वैभव लाड, गजानन घिरके, गजानन हुडेकर, राजाभाऊ पांडव यांची उपस्थिती होती.