* भक्तीच्या मृत्यूने समाजमन हळहळले
मेहकर : (एशिया मंच वृत्त)
मेहकर ते हिवरा आश्रम मार्गावरील नांद्रा धांडे फाट्यानजीक 1 एप्रिल 2023 रोजी ट्रकचालकाने चिरडल्याने झालेल्या भीषण अपघातात गजानन पांडुरंग म्हस्के (वय ४६) रा. हिवरा आश्रम यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर भक्ती गजानन म्हस्के (वय १२) ही मुलगी गंभीर जखमी झाली होती. तिच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील एशियन हॉस्पीटल येथे उपचार सुरू असताना, आज तिची मृत्युशी झुंज संपली आहे. म्हस्के कुटुंबीयांची घरची परिस्थिती हलाखीची असल्याने व घरातील कर्ता व्यक्तीच गेल्याने, भक्तीच्या उपचारासाठी लागणारा 15 लाखांपैकी 11 लाख रुपयांचा निधी अनेक दानशुर हातांनी उभा केला होता. परंतु, काळाने अखेर कु. भक्तीवर काळाने घाला घातलाच वडिलांपाठोपाठ भक्तीने देखील जगाचा निरोप घेतल्याने समाजमन हळहळले आहे.
