शाहू, फुले, आंबेडकर फाउंडेशन चा उपक्रम * घारोड येथे कोवीडमुळे पितृछत्र गमावलेल्या विद्यार्थ्यास सायकल व रोख ४ हजार रुपयांची मदत

 शाहू, फुले, आंबेडकर फाउंडेशन चा उपक्रम
 * घारोड येथे कोवीडमुळे पितृछत्र गमावलेल्या विद्यार्थ्यास सायकल व रोख ४ हजार रुपयांची मदत

खामगाव : (एशिया मंच वृत्त)
      समता पर्वानिमित्त शाहू, फुले, आंबेडकर फाउंडेशन च्या वतीन विविध समाज उपयोगी उपक्रम सुरु आहेत त्यातील महत्वपूर्ण उपक्रम म्हणजे कोविड-१९ मुळे कर्ता व्यक्ती गमावलेल्या कुटुंबियांच्या पुनर्वसनासाठी विशेष प्रयत्न सुरु आहेत म्हणून  १३ एप्रिल २०२३ रोजी खामगाव तालुक्यातील घारोड येथील कोविड-१९मुळे पितृछत्र गमावलेल्या एकल बालक शे. फरहान शे. इरफान या गरीब विद्यार्थ्यांला लाखनवाडा येथे शाळेमध्ये पायी जाव लागत असल्याने त्याची दखल घेऊन शाहू, फुले, आंबेडकर फाउंडेशन अध्यक्ष पत्रकार सचिन ठाकरे यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून शाहू, फुले, आंबेडकर फाउंडेशन च्या वतीन ह्या विद्यार्थ्यांला ६ हजार रुपये  किंमतीची नवीन सायकल आणि शालेय साहित्यासाठी ४ हजार रोख अशी एकूण १० हजार रूपये  मदत उपलब्ध करून दिली.  १२ एप्रिल ला मदत प्रदान करण्यात आली. ह्यावेळी घारोड ग्राससुधार समितीचे मुख्य समन्वयक  गजानन परकाळे यांच्या हस्ते मदत स्वीकारताना शे. फरहान आणि त्याची आई तबसुम परविन शे. इरफान तर बाजूला तंटामुक्ती अध्यक्ष मा. श्री. आनंदा दुतोंडे, पत्रकार सचिन ठाकरे, सामाजिक कार्यकर्ते मंगेश कड, सचिन दांदळे, गजानन आवारकर, दिलदारखा पठाण, शे. नकीम शे. रसूल, भगवान बोरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


                      जाहिरात