जिह्यातील डॉ. झंवर, शेळके ,वराडे, सपकाळ या भूमिपुत्रांना 'जिल्हाभूषण' पुरस्कार घोषित


 जिह्यातील डॉ. झंवर, शेळके ,वराडे, सपकाळ या भूमिपुत्रांना 'जिल्हाभूषण' पुरस्कार घोषित
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
         जिल्ह्याच्या नावलौकिकात भर घालणाऱ्या विविध क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तीमत्त्वाची दखल घेऊन त्यांना 'जिल्हाभूषण' पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. यामध्ये बुलडाणा अर्बनचे सीईओ डॉक्टर सुकेश झंवर, अभिता लँड कंपनीचे प्रवर्तक माजी उपजिल्हाधिकारी सुनील शेळके, प्रशासकीय सेवेत आपला उत्कृष्ट ठसा उमटवीणारे उपजिल्हाधिकारी ललित कुमार वराडे यांच्यासह सामाजिक क्षेत्रातील मोठे नाव सुनील सपकाळ यांना जिल्हा भूषण पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. तरुणाई फाउंडेशनच्या वतीने हे पुरस्कार देऊळगाव माळी येथे दिले जाणार आहे.
       बुलडाणा अर्बन चे रोप भाइजीनी लावले. त्या संस्थेला जगमान्य करण्याचे काम डॉक्टर सुकेश झंवर अथकपणे करीत आहे. उत्कृष्ट मॅनेजमेंटमुळे बुलडाणा अर्बन जिल्ह्यातील राज्यातील तरुणांसाठी रोजगाराचे मोठे माध्यम ठरले आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था असा लौकिक देखील संस्थेने प्राप्त केला यात डॉक्टर झंवर यांचे उत्कृष्ट नियोजन आहे. 'दयाभाव' हा स्थायीभाव असणारे डॉक्टर झंवर नवोद्योजकांसाठी 'आयडॉल' ठरले आहे.
         प्रशासकीय सेवेत असताना सुनील शेळके यांनी उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी म्हणून आपली छाप सोडली आहे.त्यांची राजर्षी शाहू पतसंस्था शिरपूर सारख्या छोटे खेडेगावातून महानगरापर्यंत पोहोचण्यात शेळके यांचे मार्गदर्शन मौलिक ठरले. दिशा बचत गट फेडरेशन च्या माध्यमातून त्यांच्या पत्नी एडवोकेट जयश्रीताई शेळके यांनी जिल्ह्यात महिलांची फौज उभी केली आहे. अभिता लँड सोलुशन ने राज्यस्तरावर कार्यारंभ केले आहे. वेगवेगळे उद्योग व्यवसाय उभे करून ते शिखरावर कसे न्यावेत याचा आदर्श सुनील शेळके ठरले. तर उपजिल्हाधिकारी ललित कुमार वराडे हे प्रतिकूल परिस्थितीतून देऊळगाव माळी सारख्या छोट्या गावातून पुढे आले आहेत. परिस्थितीचा बाऊ न करता संघर्ष कसा करावा याचा परिपाठ ललित कुमार वराडे यांनी दिला आहे.
          विविध सामाजिक चळवळी सोबत जोडले जाणारे मोठे नाव म्हणजे सुनील सपकाळ. बुलडाण्यातील पुरोगामी सांस्कृतिक चेहरा म्हणून सपकाळ हे चीर परिचित आहे. बुलडाण्यात साजरी होणाऱ्या सार्वजनिक शिवजयंतीची दखल संपूर्ण राज्यभर घेतली जाते. त्याची संकल्पना सपकाळ यांनी मांडली. तिला सर्व शिवप्रेमींनी तितकिच 
उत्कृष्ट  दाद दिली आहे. सामाजिक कार्यात त्यांचे योगदान मोठे आहे. 
        या सर्वांच्या कार्याची दखल घेत तरुणाई फाउंडेशन द्वारा देऊळगाव माळी येथे 25 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी त्यांचा सन्मान केला जाणार आहे. प्रसंगी शेतकरी नेते रविकांत तुपकर, अप्पर पोलीस अधीक्षक बाबाराव महामुनी , पत्रकार गणेश निकम, निवृत्त अभियंता नारायण बळी आदींची उपस्थिती राहणार आहे.संचलन रणजितसिंग राजपूत हे करणार आहे, असे आयोजक तथा तरुणाई फाऊंडेशनचे अध्यक्ष  पत्रकार कैलास राऊत यांनी कळविले आहे.