युवकांची माथी भडकाविणाऱ्या प्रवृत्तीवर अंकुश लागलाचं पाहिजे* जिल्हा पोलीस अधिक्षक सारंग आवाड यांचे प्रतिपादन

युवकांची माथी भडकाविणाऱ्या प्रवृत्तीवर अंकुश लागलाचं पाहिजे
* जिल्हा पोलीस अधिक्षक सारंग आवाड यांचे प्रतिपादन
मोताळा  : (एशिया मंच वृत्त)
        सर्वधर्मसमभावाची भावना कृतीप्रवन असावी. पुरोगामी महाराष्ट्रात युवाकांची माथी भडकवणाऱ्यां समाजविघातक प्रवृत्तींवर अंकूश लागलाच पाहिजे. शांतता प्रिय गावातही दंगली होत असतील तर सर्वधर्मसमभावाचा पुरस्कार करणारे आम्ही सर्वच कूचकामी ठरल्याचे धोतक आहे. वर्दीतील आणि साध्या वेशातील पोलीस यांच्यातील समन्वय आणि सजगता समाज विघातक प्रवृत्तींना ठेचून काढण्यासाठी महत्त्वपूर्ण दुवा आहे. असे मत जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आवाड यांनी व्यक्त केले.
        मोताळा तालुक्यातील हिंदू मुस्लिम सामाजिक ऐकोपा वृद्धिंगत करण्यासाठी ग्राम कोथळी येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस स्टेशन बोराखेडी आणि आझाद हिंद हिंदू-मुस्लिम एकता मंच यांच्या संयुक्त विद्यमानाने 19 एप्रिलला सायंकाळी आयोजित इफ्तार पार्टीला मार्गदर्शन करतांना जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आवाड यांनी उपरोक्त मत व्यक्त केले. इफ्तार पार्टीला आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.सतीशचंद्र रोठे, जामा मस्जिदचे शहाबान मौलाना, माजी सभापती मिलिंद जयस्वाल, पोलीस निरीक्षक बळीराम गीते, विठ्ठल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. किराये का मकान है, जाती घर थोडी है, हर इंसान का लहू बहा है, यहा की मिट्टी मे, हिंदुस्तान किसी के बाप का थोडी है गजलेने सूरवात करीत हिंदू मुस्लिम एकात्मतेवर प्रबोधनकार अँड‌.सतीशचंद्र रोठेंनी मार्मिक प्रबोधन केले. तर यावेळी शाहाबान मौलाना, मिलिंद जयस्वाल यांनीही समायोजित मनोगत व्यक्त केले. इरफान पठाण सर यांनी  सूत्रसंचालन केले. (जिल्ह्यातील हिंदू मुस्लिम एकात्मतेची शिवजयंती म्हणून ग्राम कोथळी असून शिवजयंतीची मिरवणूक मशिदवर फुले उधळून हिंदू मुस्लिमांच्या आयोजनातुन निघत असल्याची माहिती मिळाल्यावर प्रामुख्याने ग्राम कोथळी येथील हिंदू मुस्लिम एकात्मतेचे अभिनंदनही पोलीस अधीक्षकांनी केले.आयोजन समीतीचे असलम शाह, शेख सईद, सैय्यद यूसूफ, कूरबान शाह, वर्षा ताथरकर, परविन बी, गुलाब शाह, इमरान शाह, संजय वाढे, संतोष भुंगे, सरपंच प्रकाश जयस्वाल, ठोंबरे सर, आदील जमदार, शरीफ जमदार, लतीफ शाह यांच्यासह आझाद हिंद शेतकरी संघटना, आझाद हिंद हिंदू-मुस्लिम एकता मंच, पोलीस पाटील संघटना, तंटामुक्ती समिती, जामा मशिदचे विद्यार्थी, बोराखेडी पोलीस स्टेशन कर्मचारी यासह सामाजिक, धार्मिक व राजकीय संघटनांचे आजी माजी पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते. उपस्थिततांनी मुस्लिम बांधवांसोबत रोजा सोडला. त्यानंतर फळ फ्रुट वाटप करून इफ्तार पार्टीची सांगता करण्यात आली.