व्हॉईस ऑफ मीडियाच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्षपदी अनिल म्हस्के पाटील यांची नियुक्ती

व्हॉईस ऑफ मीडियाच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्षपदी अनिल म्हस्के पाटील यांची नियुक्ती
बारामती  : (एशिया मंच वृत्त)
        पत्रकारीता आणि पत्रकारांच्या कल्याणासाठी राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या व्हॉईस ऑफ मीडियाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी अनिल म्हस्के पाटील यांची निवड करण्यात आली आहे. बारामती येथे ११ मार्च २०२३ रोजी आयोजित कार्यशाळेत त्यांच्या नावाची घोषणा करुन संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, राष्ट्रीय सरचिटणीस चंद्रमोहन पुप्पाला यांच्याहस्ते व राष्ट्रीय कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी प्रत्येक जिल्ह्याच्या वतीने अनिल म्हस्के यांचे स्वगत आणि सत्कार करण्यात आला.