बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
पत्रकारितेत तसेच संघटनेत उत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष प्रा.सुभाष लहाने यांना शिर्डी येथे आयोजित महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अधिवेशनात मानचिन्ह देऊन सम्मानित करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई यांचे अधिवेशन शिर्डी येथील हॉटेल शांती कमल येथे नुकतेचं संपन्न झाले. विदर्भ उपाध्यक्ष भानुदास लकडे व जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र वाघ यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.