बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
निराधार, बेवारस नागरिकांना आश्रयाने छत देणाऱ्या दिव्या फाउंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रकल्पाचे संस्थापक अशोक काकडे यांच्या वतीने विविध क्षेत्रातील कर्तुत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. बुलडाणा रेसिडेन्सी क्लब येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना दिव्य परिवाराचे संस्थापक अशोक काकडे म्हणाले, 'दिव्य सेवा प्रकल्पाच्या माध्यमातून निराधार लोकांची सेवा करताना मोठ समाधान मिळत. या कार्यात पत्नीचं मोठ सहकार्य लाभत. महिला आपल्या समाजाचा आरसा आहेत. समाजात कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या अनेक महिला आहेत त्यांच्या कार्याला पाठबळ मिळावे म्हणून कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करणे ही निश्चितपणे समाधानाची भावना होती.
या कार्यक्रमाचे उद्घाटन सौ. प्रभाताई वसंतराव चिंचोले यांच्या हस्ते संपन्न झाले. तसेच स्वागताध्यक्षा म्हणून डॉ. अश्विनी योगेश शेवाळे यांनी जबाबदारी पार पडली. या विशेष उपस्थिती डॉ सुकेश झंवर चीफ मॅनेजिंग डायरेक्टर बुलढाणा अर्बन, प्रज्ञा कोळी( नृत्य दिग्दर्शिका, मुंबई), सुनिता देवकर (अदिती अर्बन परिवार, बुलडाणा), प्रा. डॉ. प्रभा तिरमारे, डॉ. अर्चना गुणवीर, डॉ. भारती गुरुदासाणी, ज्योती पाखरे, अविनाश पाटील, सीमा पाटील, , राजेंद्र घोरपडे मुंबई पोलीस . तसेच या कार्यक्रमास पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, तर डॉ. वैशाली निकम, डॉ. निलिमा जाधव, ॲड. वर्षा पालकर, डॉ. रसिका वानखेडे, श्रीमती डॉ. अनुश्री पवार, अपेक्षा गजभिये, मंगला गायकवाड, कोकिळा तोमर यांचे सन्मान करण्यात आला आणि यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली तायडे यांनी केले.
कार्यक्रमासाठी ज्योती पाटील, भाविका धनवानी, प्रा.रविकिरण मोरे, शैलेश खेडेकर, जयश्री देशमुख, राजेंद्र टिकर,अविनाश पाटील सुषमा राऊत, शिल्पा मोकळे, हेमा धनवानी, अविनाश डोंगरे, अजय जाधव, विशाल ग्यारलं, सचिन पाटील पल्लवी पाटील,इम्रान शेख,चैतली इंगळे,संदीप चंदन लखन फेटेवाले, मोक्ष धनवानी यांनी परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन अशोक काकडे यांनी केले.