महाराष्ट्र मराठा सोयरीक च्या वतीने जागतिक महिला दिनी तमाम महिलांचा सन्मान

महाराष्ट्र मराठा सोयरीक च्या वतीने जागतिक महिला दिनी तमाम महिलांचा सन्मान
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
        8 मार्च रोजी  जागतिक महिला दिनाचे  निमीत्त  साधून डॉक्टर सौ. संजीवनी शेळके यांच्या निवासस्थानी महाराष्ट्र मराठा सोयरिक ची बैठक संपन्न होऊन शहरातील कर्तुत्वान महिलांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र मराठा सोयरिक मंडळाच्या वतीने २ एप्रिल 2023 रोजी बुलढाणा शहरांमध्ये मोठा वधु-वर परिचय मेळावा आयोजित करण्यात येत आहे.
       मराठा समाजातील उपवर वधू वरांचा परिचय मेळावा महाराष्ट्र मराठा सोयरिक मंडळातर्फे प्रवेशितांसाठी पूर्णतः मोफत असणार आहे.
शेतकरी, कष्टकरी व ग्रामीण तरुणांसाठी ही एक मोठी संधी आहे. शिक्षण ,नोकरी, रोजगार, आर्थिक पाठबळ, वैचारिक बैठक, राजकीय उलाढाली, अशा प्रकारच्या असंख्य समस्या भोवताली घोंघावत असताना किमान विवाह संस्थेच्या माध्यमातून निर्माण होणारे कौटुंबिक आयुष्य सुव्यवस्थित असावे एवढा विचार घेऊन महाराष्ट्र मराठा सोयरीक मंडळाचे प्रणेता सुनीलभाऊ जवंजाळ हे मराठा समाजातील अंतर्गत पोट जातीचा भेद दूर करून खुल्या वातावरणात वधु-वर परिचय करून घेण्याची संधी निर्माण करीत आहेत. या बाबीचे समाजातून स्वागत होत आहे.
       बुलडाणा जिल्हा जिजाऊंचे माहेर म्हणून ओळखला जातो, महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र मराठा सोयरीक मंडळाने 2 एप्रिल रोजी बुलडाणा शहरात होणारे मेळाव्याचे संयोजनाची महत्त्वाची धूरा संभाळण्याचा बहुमान जिल्ह्यातील महिलांना दिला आहे. महिलांचे कार्यक्षेत्र केवळ चूल आणि मुल इतके मर्यादित नसून परिवाराला दिशा देऊन समाज सुदृढ करण्याचे सामर्थ्य महिलांमध्ये आहे , या भावनेने महाराष्ट्र मराठा सोयरीक मंडळाच्या वतीने मेळाव्याच्या आयोजनाची धुरा महिलाच पेलतील असे महिला दिनी घोषित करून समस्त महिलावर्गाचा गौरव केला आहे. बैठकीला शहरातील बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते.