धोत्रा भणगोजी येथील जि. प. मराठी शाळेत महिला दिन साजरा

धोत्रा भणगोजी येथील जि. प. मराठी शाळेत महिला दिन साजरा
चिखली  : (एशिया मंच वृत्त)
आज ८ मार्च अर्थात जागतिक महिला दिन. स्त्रियांवर होत असलेले अत्याचार, अन्याय दूर व्हावे, सर्वच क्षेत्रात महिलांचा विकास व्हावा यासाठी आज जगभर महिला दिन म्हणून साजरा केला जातो.
       ८ मार्च २०२३ रोजी  जागतिक महिलादिनानिमित्त जि. प मराठी उच्च प्राथमिक शाळा तालुक्यातील धोत्रा भणगोजी येथे प्रत्येक वर्गातील उल्लेखनिय प्रगती साधणाऱ्या विद्यार्थिनी चा व अंगणवाडी सेविका, मदतनीस, शालेय पोषण आहार स्वयंपाकी, तसेच शाळेतील कर्तव्यतत्पर भगिनी सौ. मनीषा शेळके यांचा गुणगौरव करण्यात आला. जागतिक पातळीवर महिला हिताचे तसेच सामाजिक राजकीय, शैक्षणिक, वैज्ञानिक, वैध्यकीय, विविध क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्या मातृशक्तीच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला. कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन सौ शेळके मॅडम यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व विद्यार्थिनींनी  परिश्रम घेतले.