महिला दिनी महिलेचे अवैध धंद्या विरूध्द आत्मदहनचा प्रयत्न* जिल्हाधिकारी कार्यालय समोरील घटना

महिला दिनी महिलेचे अवैध धंद्या विरूध्द आत्मदहनचा प्रयत्न
* जिल्हाधिकारी कार्यालय समोरील घटना
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
       जागतिक महिला दिनानिमित्त एका महिलेला अवैध धांद्या विरूध्द जिल्हाधिकारी कार्यालय समोर अंगावर डिझेल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न करावे लागत असल्याची ही एक निंदनीय प्रकार बुधवार  ८ मार्च २०२३ रोजी घडला.
         सदर महिलेने जिल्ह्यातील अवैध धंदे , कॅफे हे बंद करण्यात यावे यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस विभाग यांना एक महिन्या पूर्वी निवेदन देऊनही या अवैध धंद्यांवर अंकुश करू न शकलेल्या प्रशासन विरूध्द त्या महिलेला आत्मदहन करावे लागले परंतु वेळीच हजर असलेल्या महिला पोलीसामुळे पुढील अनर्थ टळला. 
       यावेळी आझाद हिंद संघटनेच्या वर्षा ताथरकर यांनी सांगितली की, शेतकरी आंदोलनातील खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे, महीलेवरील होत असलेले अत्याचार थांबविण्यात यावे तसेच  जिल्ह्यात सुरू असलेल्या या अवैध धंद्याला बंद करण्यासाठी निवेदन दिले होते, परंतु पोलीस प्रशासन हे पूर्णपणे अपयशी ठरली. तरी या धंद्यावर कार्यवाही करण्यात आली नसल्याने त्या महिलेने पोलीस प्रशासन हाय हाय चे नारे दिले. दरम्यान पोलिसांनी वर्षा ताथरकर यांना ताब्यात घेऊन शहर पोलीस स्टेशनला स्थान बध्द केले. पुढील कारवाई शहर पोलिस करीत आहे.