* हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचे प्रेमकुमार राठोड यांचे आवाहन
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
जगतगुरु संत सेवालाल महाराज यांची पुण्यभूमी तथा बंजारा समाजाची काशी अशी ख्याती असलेल्या वाशिम जिल्हयातील पोहरागड येथे 12 फेब्रुवारी रोजी आयोजित सेवाध्वज कार्यक्रमात बुलडाणा जिल्हयातील बंजारा समाज बांधवांनी हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन बंजारा महासंघाचे प्रेमकुमार राठोड यांनी केले आहे.
यावेळी महाराष्ट्र शासनाच्या वतीने पोहरागड येथे 593 कोटी रूपये खर्चाच्या विविध विकास कामाचे भूमिपूजन होणार असून, या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते होत असून यावेळी उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुगंटीवार, चंद्रकांतदादा पाटील, डॉ. विजयकुमार गावित, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, दादाजी भुसे, डॉ. सुरेश खाडे, संदीपान भुमरे, उदय सामंत, तानाजी सावंत, रवींद्र चव्हाण, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, अतुल सावे, शंभूराज देसाई, मंगलप्रभात लोढा, मनोहर नाईक, खा. भावना गवळी, आ. राजेंद्र पाटणी, तसेच गोर बंजारा संघटनेचे अविनाश नाईक, निलय नाईक, खा. कविता मालोथ, प्रभू चव्हाण, सत्यावती राठोड, उमेश जाधव, आ. तुषार राठोड, आ. इंद्रनील नाईक, हरिभाऊ राठोड, धोंडीराम राठोड, राजेश राठोड, प्रदीप नाईक, किसनराव राठोड, शंकर पवार आदींची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रक राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा यवतमाळ जिल्हयाचे पालकमंत्री संजय राठोड आहेत. कार्यक्रमाचे आयोक नंगारा राज्य समन्वय समिती व जिल्हा समन्वय समिती, सहकार्य व संयोजक गोर बंजारा समाज महाराष्ट्र हे आहेत. या कार्यक्रमा दरम्यान 12 फेब्रुवारीला पोहरादेवी येथे सेवाध्वज स्थापना, संत सेवालाल महाराज अश्वारूढ पुतळयाचे अनावरण व पोहरा-उमरी तिर्थक्षेत्र व वनोदयानाच्या 593 कोटी रूपये खर्चाच्या विकास कामाचे भूमिपूजन मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे. या स्वर्ण क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी या कार्यक्रमाला बुलडाणा जिल्हयातील हजारो बंजारा बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन पत्रकार प्रेमकुमार राठोड यांनी केले आहे.