जागृक पालक सुदृढ बालक अभियानास सुरूवात

जागृक पालक सुदृढ बालक अभियानास सुरूवात
बुलडाणा  : (एशिया मंच वृत्त)
       जागृक पालक, सुदृढ बालक  अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थामध्ये 0 ते 6 आणि 6 ते 18 वर्ष वयोगटातील शालेय मुलांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. या अभियानाची सुरवात बुलडाणा येथील एडेड हायस्कुल आणि ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र, हतेडी येथे करण्यात आली.
       शहरी भागात बुलडाणा शहरातील एडेड हायस्कुल आणि ग्रामीण भागासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, हतेडी येथे या मोहिमेची सुरवात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एम. एम. राठोड यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सरपाते, हतेडीच्या सरपंच श्रीमती जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता रिंढे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. तुषार शेळके, डॉ. अरुणधती ठोंबरे, आरोग्य सहायक एम. पी. चव्हाण, तालुका आरोग्य सहाय्यक लता गुर्जर उपस्थित होते.
        राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्यामध्ये गुरूवार, दि. 9 फेब्रुवारी 2023 पासून राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमात 0 ते 6 आणि 6 ते 18 वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांची वर्षातून एकदा आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. जागृक पालक व सुदृढ बालक या अभियानांतर्गत या वयोगटातील सर्व बालकांची तपासणी व संदर्भ द्यावयाची आहे.
       कार्यक्रमाला आरोग्य सेवक पुरुषोत्तम साळोख, रविंद्र गारवे, नितिष आमल, आरोग्य सेविका लक्ष्मी सुरोशे, शारदा डुकरे, शारदा सुरडकर, रेखा जाधव, सुनिता जवंजाळ, सिमा इंगळे, रुपाली विरहार, शिला जेउघाले, आरोग्य सहाय्यक सुषमा जाधव, औषध निर्माण अधिकारी श्री. नरवाडे, प्रयोग शाळा तंत्रज्ञ श्रीमती साखरे उपस्थित होते.