युवक काँग्रेस पदाधिकारीचं बनत आहेत राहुलजींच्या भारत जोडो यात्रेतील खोडा

युवक काँग्रेस पदाधिकारीचं बनत आहेत  राहुलजींच्या भारत जोडो यात्रेतील खोडा
बुलडाणा: (एशिया मंच वृत्त)
       केंद्रातील सरकार जनतेच्या अपेक्षांची पुर्ती करण्यात असफल ठरले असून, केंद्रातील मोदी सरकारने देशाच्या विकासा एैवजी जातीय व धार्मिक तेढ वाढविण्याचे प्रयत्न सुरू केले असून त्यामुळे भारत तोडला जात आहे. देशाला जोडण्यासाठी काँग्रेसचे युवा नेते राहुलजी गांधी यांनी देशभरात काढलेल्या भारत जोडो यात्रेला प्रत्येक राज्यात उदंड प्रतिसाद मिळत आहे. मोदी मिडीयाने राहुलजींच्या या यात्रेकडे दूर्लक्ष केले असल्याचा प्रत्यय प्रत्येक ठिकाणी येत आहे. 18 ते 20 नोव्हेबर दरम्यान राहुलजी बुलडाणा जिल्हयात आहेत. मात्र त्यांच्या या दौऱ्या बाबत जिल्हा युवक काँग्रेसचे पदाधिकारी व्यापक प्रसिध्दी मिळू नये या उद्देशाने  प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे. मूळातचं राहुलजींच्या दौ-याबाबत मोठया प्रमाणात सर्वसामान्य लोकांची सहानुभूती आणि उत्सुकताही आहे. राज्यात सुरू असलेल्या राजकारणावर राहुलजींचा हा दौरा काँग्रेससाठी जीवन संजीवणी प्रदान करणारा ठरू शकतो. मात्र जिल्हा युवक काँग्रेस आणि ज्या नेत्यावर या दौऱ्याच्या नियोजनाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तेचं भारत जोडो यात्रेतील खोडा ठरू पाहत आहेत. किंबहुना भारत जोडो एैवजी काँग्रेस तोडो असे तर  यांना करायचे नाही ना... राहुलजींना छोटया मोठया माध्यमातून प्रसिध्दी मिळू नये याचं हेतूने जिल्हा युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नुकत्याचं घेतलेल्या एका पत्रकार परिषदेसाठी केवळ मोजक्याचं माध्यमांच्या प्रतिनिधींना बोलावून राहुलजींच्या दौऱ्याबाबत  संकुचित माहिती देण्यामागे काय दडलय... अशी चर्चा होत आहे.